spot_img
Monday, January 20, 2025

Latest Posts

अयोध्या मिळवलं, श्रीकृष्ण भूमीदेखील मिळवून राहणार; पुण्यातील घटनेवर मंत्री नितेश राणेंची प्रतिक्रिया

पुण्यात सध्या भगवा आणि हिरवा रंगाचा वाद रंगल्याच पाहायला मिळत आहे. शहरातील सदाशिव पेठेमध्ये एका भिंतीवर हिरवा रंग लावून चादर आणि फुलं चढवल्याचा प्रकार समोर आला. भाजप खासदार मेधा कुलकर्णी यांनी भिंतीचा हिरवा रंग बदलून बघावा रंग दिला आहे. मेधा कुलकर्णी आणि त्यांच्या समर्थकांनी भिंतीवरील हिरव्या रंगावरती भगवा रंग देऊन त्याठिकाणी एक गणपतीचा फोटो ठेवण्यात आला आहे. पुणे शहरातच नाही, तर महाराष्ट्रसह इतर अनेक ठिकाणी हे प्रकार सध्या वाढले असल्याचा दावाही मेधा कुलकर्णी यांनी केला. त्यांनी यावेळी आवाहन देखील केला आहे. आपल्या आजूबाजूला काय घडतंय याकडे एक सजग हिंदू म्हणून आपण लक्ष देऊया कृती करूया, असं आवाहन त्यांनी केलं. आता भाजपचे हिंदुत्ववादी नेते आणि मंत्री नितेश राणे यांनी पुण्यातील घटनेवर बोलताना मी मेधाताईंचं अभिनंदन करतो आणि मेधा कुलकर्णी यांचे समर्थन करतो अशी प्रतिक्रिया दिली आहे.

नितेश राणेंची काय भूमिका
हिरवे आक्रमण होत आहेत, हिरवे साप वळवळतात आणि वातावरण खराब करतात. पण, हिंदू समाज म्हणून हे काम केलं पाहिजे, असे वळवळणारे साप ठेचलेत पाहिजेत, असे मंत्री नितेश राणे यांनी म्हटले. कडवट हिंदुत्ववादी म्हणून राज्यात असे प्रकार होणार नाही हा संदेश आधीच गेलाय. हिरवं आक्रमण थांबवणं आमचं कर्तव्य आहे, अशा शब्दात मंत्री नितेश राणेंनी भूमिका मांडली.

पुढे ते बोलले, जे आमचं आहे ते आम्हाला मिळालं पाहिजे आणि त्यावर आमचा अधिकार आहे. इस्लामिक आक्रमण झालं, मंदिरावर मस्जिदी बांधण्याचा कार्यक्रम केला. मात्र, ही भूमी आमची आहे, येथील इंच न् इंच जमीन आमची आहे. अयोध्या मिळवलं, आणि श्रीकृष्ण भूमीदेखील मिळवून राहणार असे म्हणत मंत्री नितेश राणे यांनी मुथरा येथील जागेवरुन पुन्हा एकदा हिंदुत्वाच्या मुद्दयावरुन परखड मत व्यक्त केलं आहे. एका बाजूला कायदेशीर मार्गाने चालत आहोत आणि त्याचबरोबर हिंदू समाजात जागृती झाली पाहिजे. आपण एकत्र आहोत, आपल्याकडून जे घेतलं गेलं तिथे आपलं मंदिर आहे, जे मिळवलं पाहिजे, अशा शब्दात नितेश राणेंनी आपली भूमिका मांडली आहे.

हे ही वाचा:

लाचखोर वनक्षेत्रपालाच्या घराची झडती; 57 तोळं सोनं अन् 1 कोटी 31 लाखांची कॅश

“आता खरी मजा आहे”, Manoj Jarange Patil यांची Devendra Fadnavis यांच्यावर टीका

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss