विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला आणि महायुतीची सत्ता बसणार हे स्पष्ट झालं आहे. महायुतीला बहुमत मिळालं आणि महाविकास आघाडीचा दारुण पराभव झाला. यानंतर विरोधक आक्रमक झाले आणि ईव्हीएममध्ये घोटाळा झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्ये बाबा आढाव यांनी ईव्हीएममध्ये गडबड असल्याचा आरोप करत आंदोलन सुरु केले.
डॉ. बाबा आढाव हे ९४ वर्षाचे आहे. त्यांनी ईव्हीएमच्या विरोधात आंदोलं केलं. ईव्हीएममध्ये घोटाळा झाल्याने महायुतीचा विजय झाल्याचा दावा त्यांनी केला आहे.३ दिवसांपासून ते उपोषणावर बसले होते. आज त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थतीत उपोषण सोडलं आहे. राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील भेट घेतली. शरद पवार यांनी देखील बाबा आढाव यांची भेट घेतली. मात्र त्यांनी उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्या उपस्थतीत आपलं उपोषण सोडलं.
निवडणूक निकालाच्या प्रक्रियेवर अनेकांनी शंका घेतल्या आहेत. त्यांची शंका दूर करण्याचं काम सरकारचं असल्याचं आहे. सरकार जर ते करत नसेल तर त्याच्या विरोधात आवाज उठवल्या शिवाय दुसरा कोणताही पर्याय नाही. असं म्हणत बाबा आढाव यांनी आंदोलनाला सुरुवात केली. लोकसभा आणि विधानसभेच्या निकालात इतका फरक कसा असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. मतदानात काहीतरी गडबड असल्याचा संषस त्यांनी व्यक्त केला आहे. म्हातारा झालो म्हणून डोळेझाक करायची का असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला आहे. सरकारचं वर्तन हे भयानक आहे. विधानसभा निवडणुकीत असा कोणता चमत्कार झाला असा प्रश्न ही त्यांनी उपस्थित केला होता.
हे ही वाचा:
एकनाथ शिंदेंची चुप्पी अन् भाजपला ताप ! शिंदेंच्या मनात नेमकं दडलंय तरी काय ?
शिंदे गटातील ‘या’ ४ नेत्यांना मंत्रिमंडळात घेण्यास भाजपचा विरोध, Eknath Shinde काय भूमिका घेणार?