Maharashtra Election Result 2024: राज्यातील विधानसभा निवडणुकीची (Maharashtra Vidhansabha Election 2024) धामधूम अखेर संपली असून निकालदेखील स्पष्ट झाला आहे. राज्यात लोकसभेत आलेल्या अपयशानंतर महायुतीने (Mahayuti) जबरदस्त परफॉर्मन्स देत बहुमत मिळवले आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) मात्र विरोधी पक्ष नेता निवडण्यासाठी पुरेसे संख्याबळदेखील मिळवता आलेले नाही. अश्यातच प्रहार जनशक्ती पक्षाचे (Prahar Janshakti Party) अध्यक्ष बच्चू कडू (Bachchu Kadu) यांनादेखील अचलपूर विधानसभा मतदारसंघातून पराभव पत्करावा लागलेला आहे. प्रहार पक्षालादेखील एकाही जागेवर निवडून येता आले नाही. यावरून आता बच्चू कडू यांनी मोठे भाष्य केले आहे. विधानसभा निवडणुकीत मुस्लिमांचा फतवा व हिंदूंचे कटोंगे तो बटेंगे या सर्व धार्मिक राजकारणात आमचा सेवेचा झेंडा हरला असल्याची प्रतिक्रिया प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख व माजी आमदार बच्चू कडू यांनी दिली आहे.
बच्चू कडू यांनी आज (बुधवार, २७ नोव्हेंबर) माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, “विधानसभा निवडणुकीत मुस्लिमांचा फतवा व हिंदूंचे कटोंगे तो बटेंगे या सर्व धार्मिक राजकारणात आमचा सेवेचा झेंडा हरला. मतदार संघात प्रचंड काम केले. 6 हजार 700 कोटींची विकास कामे केली आणि मत मिळाले 67 हजार. सेवा हरली आणि राजकारण जिंकलं अशी लोकांची प्रतिक्रिया आहे. धार्मिकता, लाडक्या बहिणींचा प्रभाव आणि ईव्हीएम मधील घोटाळा ही पराभवाची प्रमुख कारणे आहे. 29 ला मुंबई येथे सर्व जिल्हाध्यक्षांची बैठक आहे. त्यानंतर 2 तारखेला शेगाव येथे अधिवेशन आहे येथे प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक आहे त्यानंतर आम्ही आमची पुढची दिशा ठरवून सत्तेत राहायचे की बाहेर हे ठरवू,”असे ते म्हणाले.
एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाबाबत ते म्हणाले, “गरज सरो वैद्य मरो हा अजेंडा भाजपने वापरू नये. एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केली नसती तर भाजपा सत्तेत आली नसती. तर आज चित्र वेगळे राहिले असते. म्हणून आज ही जी किमिया आली आहे हे एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरी मुळे आली आहे. मात्र भाजप असे करेल वाटत नाही. एकनाथ शिंदे यांची मुख्यमंत्री पदाची दावेदार एकदम योग्य आहे,” असे बच्चू कडू म्हणाले.
हे ही वाचा:
Eknath Shinde Live: विधानसभेत मिळालेला विजय ऐतिहासिक, मी कॉमन मॅन म्हणून….काय म्हणाले एकनाथ शिंदे?
लोकसभेच्या निवडणूकीतून आम्ही जे शिकलो तसं महाविकास आघाडीने शिकलं पाहीजे: Chandrashekhar Bawankule