राज्यात आता विधानसभा निवडणुकांचे (Maharashtra Vidhansabha Election 2024) वारे वेगाने वाहू लागले आहेत. मुंबईसह संपूर्ण राज्यात निवडणुकांची धामधूम सुरू झालेली पाहायला दिसत आहे. तसेच निवडणुकांचा रणसंग्रामही आता जोरदार सुरू झाला आहे. राज्यातील विधानसभा निवडणुकांसाठी प्रचार तोफांचा झंझावात हा सुरू झाला आहे. सध्या निवडणुकांचा माहोल तापलेला आहे. सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप प्रत्यारोप, टीकाटिपण्ण्या करतायेत. अश्यातच भाजपाच्या माजी खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांच्यावर महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात आलेल्या हल्ल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. यावरून विविध राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया येत असून प्रहार संघटनेचे अध्यक्ष आणि आमदार बच्चू कडू (Bachhu Kadu) यांनीसुद्धा यावरून मोठे वक्तव्य केले आहे.
बच्चू कडू यांनी काल (रविवार, १७ नोव्हेंबर) संवाद साधत राणा दाम्पत्यावर चांगलाच निशाणा साधला. यावेळी त्यांनी रवी राणा यांच संविधानासोबत काय नातं आहे? असा सवाल उपस्थित केला. तसेच, नवनीत राणा यांच्यावर टीका आप अगर शेरणी है तो हमारी बहन भी वाघीण आहे असे म्हंटले आहे. अमरावतीतील बडनेरा विधानसभा मतदारसंघातून भाजपचे तुषार भारतीय वि. रवी राणा वि. अपक्ष उमेदवार प्रीती बंड यांच्यात लढत होईल.
काय म्हणाले बच्चू कडू?
बच्चू कडू यावेळी म्हणाले, “यावर्षी तुमचे पैसे घेऊन गपकणी दिल्याशिवाय राहणार नाही. रवी राणा यांच संविधानासोबत काय नातं आहे? लोकसभेच्या निवडणुकीत आम्हाला मैदान मिळालं होतं मात्र तेव्हा सगळे सविधान पायदळी तुडवलं होतं. ही लढाई आणि श्रीमंतांची गरीबाची आहे. अगर शेरणी है तो हमारी बहन भी वाघीण आहे.. आमची जित पक्की है 20 रुपयांची साडी अन 2 कोटी ची गाडी असा नाही, आमच्या जवळ आटो आहे,” असे ते म्हणाले.
ते पुढे म्हणाले, “आम्हाला रवी राणा सांगते खोके घेतले पण तू किती ओके आहे. अनेक भागात राणा यांच्या बॅनर वर भाजपाच्या नेत्यांचे फोटो नाही.हिंदू शेरणी बडनेरा मतदारसंघातुन गायब आहे..प्रीती बंड नसत्या तर ही लढाई वेगळ्या बाजूने दिली असती…पण वरचे लोक चोरटे निघाले. काल जे खल्लारला झाल खुर्चा फेकल्या त्याला आम्ही समर्थन देत नाही. पण ते खरं आहे का खोटं ते तपासलं पाहिजे. बच्चू कडूंना जर धमक्या द्याल तर पोलिसांनी लक्षात ठेवा आम्ही परदादा दादा आहोत.”
हे ही वाचा:
मनोज जरांगेनी सांगितले, विधानसभा निवडणुकीत कोणत्या पक्षाला किंवा अपक्षाला पाठिंबा…
अमित शाह यांनी उद्धव ठाकरे यांना दिले थेट आव्हान…, म्हणाले…