spot_img
Friday, December 6, 2024
spot_img

Latest Posts

Bala Nandgaonkar यांनी उद्धव ठाकरेंना घातली साद; म्हणाले, “राज ठाकरे मनातून फार…”

राज्यात नवनवीन घडामोडी देखील सध्या घडत असल्याचे चित्र दिसून येत आहे. अशातच मनसेचे शिवडीतील उमेदवार बाळा नांदगावकरांनी उद्धव ठाकरेंना साद घातल्याचे दिसून आले.

राज्यात निवडणुकांची धामधूम सुरू झालीये. निवडणुकांचा रणसंग्राम आता जोरदार सुरू झाला आहे. संपूर्ण राज्यभरात दिनांक २० नोव्हेंबर २०२४ रोजी एकाच टप्प्यात विधानसभा निवडणुका या पार पडणार आहेत. आणि २३ नोव्हेंबर २०२४ रोजी या निवडणुकांचा निकाल हा जाहीर होणार आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यातील विधानसभा निवडणुकांसाठी प्रचार तोफांचा झंझावात हा सुरू झाला आहे. जोरदार प्रचार आता सगळ्याच पक्षांकडून सुरू झाले आहेत. राज्यात नवनवीन घडामोडी देखील सध्या घडत असल्याचे चित्र दिसून येत आहे. अशातच मनसेचे शिवडीतील उमेदवार बाळा नांदगावकरांनी उद्धव ठाकरेंना साद घातल्याचे दिसून आले.

आम्ही नाती जपली, पण राज ठाकरेंनी रक्ताचं नातं जपलं. आदित्य वरळीतून उभे होते त्यावेळी आपल्या घरातील व्यक्ती उभा आहे असं समजून राज ठाकरेंनी उमेदवार दिला नव्हता. पण अजूनही वेळ गेली नाही असं म्हणत मनसेचे शिवडीतील उमेदवार बाळा नांदगावकर यांनी उद्धव ठाकरेंना साद घातली. माहीमच्या उमेदवारी आधी आम्ही जाहीर केली, नंतर उद्धव ठाकरेंनी जाहीर केली. उद्धव ठाकरेंनी अमित ठाकरेंसमोर उमेदवार द्यायला नको होतं असं बाळा नांदगावकर म्हणाले. पुढे ते म्हणाले की, अमित ठाकरे यांच्यासमोर उद्धव ठाकरेंनी उमेदवार दिलाच पण शिंदेंनीही दिला. माहीमच्या आधी आम्ही उमेदवारी जाहीर केली. मात्र अजूनही वेळ गेलेली नाही. शेवटी जे काही वैभव, मान सन्मान आम्हाला मिळाला आहे ते याच ठाकरे कुटुंबामुळे. जे जपणं आवश्यक होतं. याबाबतीत विचार व्हायला हवा होता.

बाळा नांदगावकर पुढे म्हणाले की, राज ठाकरे मनातून फार हळवे आहेत. अगदी बाळासाहेबांप्रमाणेच ते आहेत. सगळे ठाकरे असेच आहेत. अमित ठाकरे निवडणूक लढवतील याबाबत खरंच कल्पना नव्हती, मात्र पक्षातील नेत्यांनी निवडणूक लढायला हवं असे मत त्यांनी मांडले. त्यानंतर निवडणूक लढवण्याबाबत चर्चा सुरु झाली आहे. राज ठाकरेंच्या जे पोटात असतं तेच सडेतोड बोलतात. आम्ही नाती जपली पण त्यांनी रक्ताचं नातं जपलंय. आदित्य उभा होता तेव्हा ठाकरे घराण्यातला व्यक्ती उभा आहे हे लक्षात घेऊनच त्यांनी उमेदवार दिला नाही. राजकारणाच्या पलीकडचं नातं जपण्याचं काम कायमच त्यांनी केलं. निवडणुकीच्या निकालानंतर जो सत्तेत बसेल तोच आमच्याच पाठिंब्यामुळे, असे बाळा नांदगावकर म्हणाले.

हे ही वाचा:

जळगावच्या सभेतून शरद पवारांनी केला जोरदार हल्लाबोल, मोदींना संविधान बदलता आलं नाही…

एकनाथ शिंदेंनी दिला सभेला नकार, उमेदवाराचा ब्लडप्रेशर वाढून थेट हॉस्पिटलमध्ये दाखल

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss