महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचं घोडामैदान आता जवळ आलं आहे. या निवडणुकीत काय होणार ते २३ नोव्हेंबरला समजणार आहे. महाराष्ट्रात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा थेट सामना होणार आहे. याच पार्श्वभूमीवर महायुती आणि महाविकास आघाडीकडून जोरदार प्रचार सभा सुरु आहेत. अलीकडेच उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांनी महाराष्ट्रातील प्रचारसभेतून बोलताना ‘बटेंगे तो कंटेंगे’ चा नारा दिला होता. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ‘एक है तो सेफ है’ असे म्हटले होते. महायुतीकडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील या घोषणेचा विरोध केल्याचे दिसून आले. आता यावरून काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी अजित पवारांना महायुतीतून बाहेर पडण्याचा सल्ला दिला आहे.
काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात म्हणाले की, लोकशाहीत विकासाची चर्चा झाली पाहिजे. सर्वानी ‘बटेंगे तो कंटेंगे’चा विरोध केला पाहिजे. बेरोजगारी, महागाई आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोला. त्यावर हे बोलायला तयार नाहीत, अशा काहीतरी घोषणा दिल्या तर आपोआप मते पडतील असे त्यांना वाटते. अजित पवारांना (Ajit Pawar) हे मान्य नसेल तर त्यांनी महायुतीतून बाहेर पडावे. फक्त विरोध करून गप्प बसणे शक्य नाही, असा सल्ला थोरातांनी अजित पवारांना दिला.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत भाजपने व्होट जिहादचा आरोप करत महाविकास आघाडीवर जोरदार हल्लाबोल केलाय. यावर बाळासाहेब थोरात म्हणाले की, ‘व्होट जिहाद’ हा नवा शब्द भाजपने काढला. कांदा उत्पादकांनी आम्हाला मते दिली तर कांदा जिहाद बोलणार का? शेतकऱ्यांनी मते दिली तर त्याला शेतकरी जिहाद म्हणायचे का? भेद निर्माण करणे ही भाजपची पद्धत आहे. महागाई, बेरोजगारी शेतकरी या विषयावर ते बोलू शकत नाही. दिशाहीन करण्यासाठी व्होट जिहादसारखे मुद्दे काढले जात आहेत. हा सगळा विष पेरण्याचाच कार्यक्रम आहे, अशी टीका बाळासाहेब थोरात यांनी भाजपवर केली आहे.
हे ही वाचा:
मनोज जरांगेनी सांगितले, विधानसभा निवडणुकीत कोणत्या पक्षाला किंवा अपक्षाला पाठिंबा…
अमित शाह यांनी उद्धव ठाकरे यांना दिले थेट आव्हान…, म्हणाले…
Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.