Suresh (Balyamama) Mhatre: राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) भिवंडीचे खासदार सुरेश म्हात्रे (बाळ्या मामा) यांनी केंद्रीय मंत्री अमित शहा यांची भेट घेतली. भिवंडीमध्ये अवैध अमली पदार्थांचा व्यवसाय सुरू असून गुन्हेगारी वाढली आहे असल्याने अशा गुन्हेगारांवर कठोर कारवाई व्हावी यासाठी ही भेट घेतल्याचे बाळ्या मामा यांनी सांगितले. भिवंडी लोकसभा मतदारसंघात गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढली असून वाढत्या गुन्हेगारी बरोबरच शहरात अवैध ड्रग्स व्यवसाय देखील मोठ्या प्रमाणात सुरू आहे. या अवैद्य ड्रग्स माफियांमुळेच शहरात व आजूबाजूच्या परिसरात गुन्हेगारी प्रचंड वाढली असल्याने गुन्हेगारांसह ड्रग्स माफियांवर कठोर कारवाई करावी या संदर्भात भिवंडी लोकसभेचे खासदार सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची दिल्ली येथे गुरुवारी भेट घेतली. या भेटीदरम्यान त्यांनी गुन्हेगारांवर व ड्रग्स माफियांवर लवकरात लवकर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे.
भिवंडी लोकसभा मतदारसंघातील वाढत्या गुन्हेगारी व ड्रग माफियांबाबत सुरेश म्हात्रे यांनी थेट संसदेत आवाज उठवला होता. त्यानंतर पोलीस यंत्रणेने सुजीत पाटील उर्फ तात्या व काही गुंडांवर अटक कारवाई देखील केली. ऑगस्ट २०२४ मध्ये गुजरात दहशतवाद विरोधी पथकाने भिवंडी शहरात मोठी कारवाई करून ८०० कोटी रुपये किमतीचा ७९२ किलो लिक्विड एमडी ड्रगचा साठा जप्त करून दोघा जणांना अटक केली आहे. मात्र या दोन आरोपींपर्यंतच ही कारवाई थांबली असून या दोघा आरोपींच्या मागे सूत्रधार कोण आहेत याचा तपास करावा. त्याचप्रामणे, गुजरात एटीएसच्या (ATS) कारवाई नंतरही शहरात अवैध ड्रग्स व्यवसाय मोठ्या प्रमाणात आजही सुरूच आहे. शहरातील ड्रग्स माफीये व त्यांच्या सूत्रधारांवर कारवाई करण्यात यावी. अशी मागणी खा. बाळ्या मामा यांनी केली आहे.
विशेष म्हणजे, ड्रग्स माफीये व गुन्हेगार या गुंडांच्या मागे असलेल्या राजकीय वरदहस्तांमुळे पोलीस यंत्रणेला गुन्हेगारांना अटक करण्यात अडचणी येत आहेत. न्यायालयातून जामिनावर सुटल्यानंतरही हत्या, हत्येचा प्रयत्न, चोरी, दरोडे, धमकी, खंडणी, शेतकऱ्यांच्या जमिनी बळकावने असे गंभीर गुन्हे हे गुन्हेगार करतच आहेत. ही बाब सुरेश म्हात्रे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांच्या निदर्शनास आणून दिली आहे. येथील ड्रग्स माफीये व गुन्हेगारांवर कठोर कारवाई करण्यात यावी. यासंदर्भात लेखी निवेदन देण्यात आले आहे. आपल्या मागणीकडे विशेष लक्ष दिले असून लवकरात लवकर या संदर्भात पोलीस यंत्रणेला योग्य त्या सूचना देण्यात येतील असे आश्वासन अमित शहा यांनी आपल्याला दिले आहे अशी प्रतिक्रिया बाळ्या मामा यांनी दिली आहे. सुरेश म्हात्रे यांनी थेट गृहमंत्री केंद्रीय अमित शाह यांची भेट घेतल्यामुळे ड्रग्स माफीया आणि गुन्हेगारांमध्ये प्रचंड खळबळ उडाली असून पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे.
हे ही वाचा:
माझ्या घरात तलवारी असायच्या, सासऱ्यांचा अंडरवर्ल्डशी संबंध – अभिनेत्री Janhavi Killekar
Chhaava Movie: ‘छावा’ चित्रपटाची पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई !