Saturday, April 20, 2024

Latest Posts

पंकजा मुंडेंच्या विधानावर बावनकुळेंची प्रतिक्रिया

दिल्लीमध्ये आयोजित करण्यात आलेला पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीच्या कार्यक्रमामध्ये बोलताना पंकजा मुंडे यांच्या एका विधानावरून राजकीय वर्तुळामध्ये चर्चाना उधाण आले आहे.

दिल्लीमध्ये आयोजित करण्यात आलेला पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीच्या कार्यक्रमामध्ये बोलताना पंकजा मुंडे यांच्या एका विधानावरून राजकीय वर्तुळामध्ये चर्चाना उधाण आले आहे. पंकजा मुंडे म्हणाल्या होत्या की, ‘मी भाजपची आहे, पण भाजप पक्ष थोडीच माझा आहे’ या वरून राजकारणात अनेक अंदाज लावले जात आहेत. या विधानानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पंकजा मुंडे यांच्या या विधानावर प्रतिक्रिया दिली आहे. यावर ते म्हणाले की, पंकजाताई भाजप माझ्या पाठिशी आहेअसच त्या म्हणाल्या असे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.

पंकजा मुंडे यांच्या या एकदा विधानावरून राजकारणामध्ये तर्कवितर्क लावले जात आहेत. पुढे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, मी त्याच संपूर्ण भाषण ऐकलेलं आहे पंकजाताई यांनी भाजपबद्दल बोलताना पक्ष माझ्या पाठीशी आहे हे विधान केले आहे. पंकजा मुंडे या भाजपच्या नेत्या आहेत त्याच्या बोलण्याचा नेहमीच विपर्यास केला जातो असे बावनकुळे म्हणाले. पंकजाताई ज्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये फिरत आहेत त्याच पद्धतीने त्या पक्षाच्या जनसंपर्क अभियानामध्ये देखील त्या सहभागी झाल्या आहेत. मध्यप्रदेशामध्ये त्यांच्या अनेक सभा होत आहेत त्यामुळे कोणत्याही विषयाला धरून त्यांच्याबद्दल संभ्रम तयार करणे चुकीचे आहे असे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.

 

पुढे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, आमचा पक्ष हा महासागर आहे, अरबी समुद्रासारखा आहे. या महासागरामध्ये कितीही लहान, कितीही मोठा, कोणत्याही पक्षातला नेतृत्व आला तरी आमच्याकडे खूप स्पेस आहे. किसान आघाडी, महिला आघाडीसारख्या नऊ आघाड्या आहेत. ४८ लोकसभेच्या आणि विधानसभेच्या २८८ जागा युती म्हणून लढवायच्या आहेत त्यामुळे कोणत्याही पक्षातला उमेदवार आला तरी त्याच्या क्षमतेप्रमाणे त्याला काम आमच्याकडे आहे असे बावनकुळे म्हणाले.

हे ही वाचा:

खुशखबर!, LPG Gas Cylinder च्या दरात मोठी कपात, पाहा Latest Rates

Nitin Gadkari म्हणाले, ‘मंदिरांमध्ये स्वच्छतेचा अभाव आहे, मी…’

संजय शिरसाट यांना पोलिसांकडून दिलासा

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss