काही दिवसापूर्वी खोक्या उर्फ सतीश भोसले याने एका व्यक्तीला अर्धनग्न करून बॅटने बेदम मारहाण करण्याचा व्हिडीओ वायरल झाला. त्यानंतर त्याचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर वायरल झाले होते. हा खोक्या उर्फ सतीश भोसले बीड जिल्ह्यातील भाजपचे आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता आहे. बीडच्या शिरूर पोलीस ठाण्यात दोन गंभीर गुन्हे दाखल आहेत. तो चार दिवसांपासून फरार आहे. त्याच्या शोधासाठी शिरूरसह स्थानिक गुन्हे शाखेची पथके कमला लागली आहेत. खोक्याकडून पैशांचे बंडल फेकणे, हेलिकॉप्टरमधून उतरणं, हातात, गळ्यात सोन्याचे दागिने, गाड्यांमधून प्रवास असे अनेक व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. त्याच्या घराची झडती घेतल्यानंतर वन विभागाला घरामधून वाळलेले मांस, हत्यार, शिकारीचे जाळे आणि इतर साहित्य आढळले होते. तसेच दिलीप ढाकणे व महेश ढाकणे यांना कुऱ्हाड व सत्तूरने बेदम मारहाण केल्याचे वन विभागात 1, शिरूरमध्ये 2 असे एकूण 3 गुन्हे दाखल आहेत. त्याचा पोलिस शोध घेत आहेत, मात्र त्याआधी सतीश भोसले उर्फ खोक्या याची गाडी बीड पोलिसांनी जप्त केली आहे.
पोलिसांनी सतीश भोसले उर्फ खोक्याची चारचाकी गाडी बीड पोलिसांनी जप्त केली आहे. रात्री अकराच्या सुमारास बीड पोलिसांनी ही गाडी जप्त केली आहे. गुन्हा दाखल होऊन चार दिवस झाले तरी खोक्या फरार आहे. तो फरार असताना माध्यमांना मुलाखती देत आहे, मात्र तो पोलिसांना सापडत नसल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. बीड पोलीस सतीश भोसलेंचा शोध घेतला जातोय, त्याने काही जणांना बेदम मारहाण करणे, पैशांचा अपहार करणे, या संदर्भात सतीश भोसलेंवरती गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पण चार दिवस झाले तर फरार आहे. त्याचबरोबर त्यांनी या काळात माध्यमांना मुलाखती दिल्या आहेत. यामुळे तो पोलिसांना कसा सापडत नाही हा प्रश्न उपस्थित झाला आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी सतीश भोसलेंची गाडी जप्त केली आहे, रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी ही गाडी जप्त केली आहे.
सतीश भोसले गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याने काल माध्यमांना मुलाखती दिल्या, त्याने मुलाखत दिल्यानंतर पोलिसांनी त्याची गाडी जप्त केली. सतीश भोसलेला अटक कधी होणार याची चर्चा जोरदार आहे. पोलिसांकडून दोन पथक नेमण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे, ही पथकं काय करत आहेत, माध्यमांना हा सतीश भोसले मुलाखती देतोय, मग पोलिसांना तो का सापडत नाही असा प्रश्न उपस्थित होत आहे.
हे ही वाचा :
Maharashtra Budget 2025: यंदाच्या अर्थसंकल्पाने बळीराजाला काय काय दिले?
Follow Us