Thursday, March 28, 2024

Latest Posts

वर्षा निवासस्थानी जाऊन भगतसिंह कोश्यारींनी घेतली एकनाथ शिंदेची भेट

सध्या राजकारणात अनेक घडामोडींना वेग हा येत आहे. अश्यातच आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी ही समोर आली आहे.

सध्या राजकारणात अनेक घडामोडींना वेग हा येत आहे. अश्यातच आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी ही समोर आली आहे. महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी जाऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. सर्वोच्च न्यायालयाचा सत्तासंघर्षावर निकाल आला आणि या निकालानंतर झालेली ही पहिलीच भेट आहे. मागील काही दिवसात ज्या काही घडामोडी होत आहेत त्या घडामोडीकडे पाहता ही भेट अगदीच महत्वाची मानले जात आहे. सर्वोच्च न्यायालयाने सत्तासंघर्षाचा निकाल देत असताना तेव्हा राज्यपालांची भूमिका संशयास्पद होती असं म्हटलं होतं. त्यानंतर कोश्यारींच्या विरोधात प्रतिक्रियाही आल्या होत्या. या सगळ्या घडामोडी झाल्यावर भगतसिंह कोश्यारी वर्षा बंगल्यावर आल्याने आणि त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या सत्तासंघर्षावरील निकालानंतर भगत सिंग कोश्यारी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची वर्षा या निवासस्थानी घेतलेली भेट महत्त्वाची मानली जाते आहे. या संदर्भातील वृत्त टीव्ही ९ मराठीने ने दिले आहे. त्यामुळे आता मात्र राजकीय वर्तुळात विविध चर्चा सुरु झाल्या आहेत. महाराष्ट्र राज्याचे माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे सध्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्या दरम्यान त्यांनी विविध राजकीय नेत्यांची भेट घेतली. मात्र एकनाथ शिंदे यांची भेट घेणं हे महत्त्वाचं मानलं जातं आहे.

भगतसिंह कोश्यारी हे महाराष्ट्राचे राज्यपाल असताना त्यांचे उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडी सरकारसह अनेक खटके उडाले होते. तसंच या सरकारच्या कार्यकाळात आणि मविआच्या काळात महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, छत्रपती शिवाजी महाराज या महापुरुषांविषयी केलेल्या वक्तव्यांमुळे ते चांगलेच अडचणींमध्येही सापडले होते.

हे ही वाचा : 

सिद्धरामय्या यांच्या शपथविधी सोहळ्यात आमंत्रणासंबंधी संभ्रम

Thane मध्ये पुन्हा वाद!, शिवसेनेचे दोन गट एकमेकांसमोर भिडले?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Latest Posts

Don't Miss