spot_img
Wednesday, January 15, 2025

Latest Posts

Fadnavis-Bhujbal भेटीनंतर भुजबळांचे स्पष्टीकरण; म्हणाले, ” ओबीसींचं नुकसान…”

महायुतीच्या भरघोस यशानंतर मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यामुळे नाराज झालेले राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी आज २३ डिसेंबर ला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.

महायुतीच्या भरघोस यशानंतर मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यामुळे नाराज झालेले राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी आज २३ डिसेंबर ला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. जवळपास ४० मिनिटं चर्चा झाल्यानंतर भुजबळांनी प्रसारमाध्यमांसमोर चर्चेत झालेल्या विषयांवर स्पष्ट सांगितले. या भेटीत देवेंद्र फडणवीस यांच्याशी सामाजिक, राजकीय विषयांवर चर्चा झाली. महायुतीच्या विजयात ओबीसींना जे पाठबळ मिळाले त्याचा मोठा वाटा आहे. ओबीसींनी महायुतीला आशीर्वाद दिला, त्याबद्दल सर्वांचे आभार मानले पाहिजे, कोणत्याही परिस्थितीत ओबीसींचं नुकसान होऊ देणार नाही, असे छगन भुजबळ म्हणाले.

पुढे छगन भुजबळ म्हणाले की, “मी आणि समीर भुजबळ आम्ही मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. त्यांच्यासोबत अनेक विषयांवर चर्चा झाली. आम्ही सामाजिक, राजकीय अशा अनेक मुद्द्यांवर चर्चा केली. देवेंद्र फडणवीस म्हणाले की, हे आपण मान्यच करायला हवंय की जो महाविजय मिळाला त्यामागे ओबीसींचं पाठबळ मोठ्या प्रमाणावर लाभलं. त्याचाही वाटा आहे. इतर गोष्टींचा वाटा आहे. ओबीसींनी महायुतीला आशीर्वाद दिला. त्याबद्दल त्यांचे आभार मानले पाहिजे. हे लक्षात घेऊन ओबीसींचं नुकसान होणार नाही. याची काळजी मलाही खूप आहे.”

देवेंद्र फडणवीस ओबीसींचं नुकसान होऊ देणार नाही. पण आता जे काही राज्यात सुरु आहे. मला आठ ते दहा दिवसाने आपण पुन्हा भेटू आणि एक चांगला मार्ग शोधून काढू, असे फडणवीस म्हणाले. तसेच मला विनंती आहे की, ओबीसी नेत्यांना सांगा. मी साधक बाधक विचार विचार करत आहे. हा निरोप ओबीसी आणि ओबीसींना पाठबळ देणाऱ्या घटकांना द्या, असे फडणवीस म्हणाले.

हे ही वाचा:

चक्क सरकारी योजनेत Sunny Leone चे नाव; महिन्याला मिळत होते हजार रुपये

सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत ६८ जागांसाठी भरती लगेच करा अर्ज, जाणून घ्या

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss