spot_img
Sunday, March 23, 2025

Latest Posts

आम आदमी पक्षाला मोठा धक्का; मुख्य नेत्याचा पराभव

राजधानी दिल्लीत विधानसभा निवडणूकीसाठी ५ फेब्रुवारीला मतदान पार पडला आहे. आज शनिवारी या मतदानाचा मतमोजणी करण्यात येत आहे. कोणाची सत्ता येईल? हा प्रश्न सतत सर्वांच्या समोर येत आहे. गेल्या तीन टर्म आम आदमी पक्षाची सत्ता दिल्लीमध्ये होती आणि त्या आधी काँग्रेसची सत्ता होती. मात्र आता २६ वर्षांनी भाजपचे कमळ राजधानीत फुलात असल्याचे सुरवातीच्या कालामध्ये समोर आले. हे आम आदमी पक्षासाठी धक्कादायक होते. आम आदमी पक्षाला धक्केवार धक्के बसत आहे. आम आदमी पक्षाला आता मोठा धक्का बसला आहे. आम आदमी पक्षाचे मुख्य नेते अरविंद केजरीवाल यांचा पराभव झाला आहे.अरविंद केजरीवाल यांचा जवळपास 3082 मतांनी पराभव झाला आहे.

 

मनीष सिसोदीयाचा पराभव
मनीष सिसोदिया यांचा जंगपुरा मतदारसंघातून पराभूत झाला आहे. आम आदमी पक्षाचे उमेदवार मनीष सिसोदिया जंगपूर मतदारसंघातून पराभूत झाले आहेत. भाजपचे तरविंदर सिंग मारवाह यांनी ही जागा 1844 मतांनी जिंकली आहे.

आताशी यांचा विजय
कालकाजी मतदारसंघातुन आपच्या नेत्या आणि मुख्यमंत्री आताशी यांचा विजय झाला आहे. तर आताशी यांच्या विरोधात असलेले भाजपचे उमेदवार रमेश बिधोरी यांचा पराभव झाला आहे. काँग्रेसकडून अलका लांबा देशील आतीशी यांच्या विरोधात निवडणूक रिंगणात होते. अलका लांबा यांचा देखील पराभव झाला आहे.

हे ही वाचा :

संरक्षण उत्पादन क्षेत्रात पॉलिसी तयार करणारे ‘महाराष्ट्र’ पहिले राज्य!

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा 

Latest Posts

Don't Miss