spot_img
spot_img

Latest Posts

नाशिकमध्ये राज ठाकरेंच्या मनसेला मोठा धक्का, माजी आमदार नितीन भोसले यांचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश…

महाराष्ट्रातील (Maharashtra) सर्वच पक्षांकडून आगामी निवडणुकांच्या (Elections) दृष्टीने मोट बांधली जात आहे.

महाराष्ट्रातील (Maharashtra) सर्वच पक्षांकडून आगामी निवडणुकांच्या (Elections) दृष्टीने मोट बांधली जात आहे. मनसे (MNS) देखील याच इराद्याने मैदानात उतरून महाराष्ट्र फिरत आहे. मात्र नाशिकमधून (Nashik) मनसेला मोठा धक्का बसला आहे. नाशिकमधून प्रथमच मनसेचे आमदार म्हणून निवडून आलेले नितीन भोसले (Nitin Bhosle) यांनी शरद पवार (Sharad Pawar) यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (Nationalist Congress) प्रवेश घेतला आहे. शरद पवार यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा झाला असून यामुळे नाशिकमध्ये राष्ट्रवादीला (Nashik NCP) बळ मिळाले आहे.

एकीकडे राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर शरद पवार (Sharad Pawar) आणि अजित पवार (Ajit Pawar) गटाकडून जोरदार बैठक सभांचे आयोजन करण्यात येत आहे. दोन्ही गटाकडून महाराष्ट्र पिंजून काढला जात आहे. त्यामुळे आगामी काळात राजकीय वातावरण चांगलंच पेटणार असल्याचे चित्र आतापासून दिसायला सुरवात झाली आहे. अनेकजण नेते, कार्यकर्ते, पदाधिकारी कुणी घरवापसी तर कुणी नवा प्रवेश सोहळा करत आहेत. नाशिकमध्ये शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला बळ मिळाले आहे. मनसेचे (MNS) माजी आमदार नितीन भोसले (Nitin Bhosale) यांनी शरद पवार यांच्या उपस्थितीत प्रवेश घेतला आहे. त्यामुळे नाशिकमध्ये राष्ट्रवादीची ताकद वाढली आहे. नितीन भोसले हे २००६ पासून मनसेत काम करत होते. आठ वर्षे शहराध्यक्ष होते. २००९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत मनसेचे तीन आमदार नाशिक शहरात निवडून आले होते. त्यात नितीन भोसले हे पश्चिम नाशिक मतदार संघातून निवडून आले होते. त्यानंतर २०१४ आणि २०१९ मध्येही त्यांनी निवडणूक लढवली मात्र, त्यांना यश आले नव्हते. मनसेचे नेते राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मध्यंतरी भाजपाच्या विरोधात भूमिका घेतली होती. मात्र, नाशिक महापालिकेत महापौरपदाच्या निवडणुकीत स्थानिक पदाधिकाऱ्यांची भाजप (BJP) नेते गिरीश महाजन (Girish Mahajan) यांच्याशी भेट झाल्यानंतर वातावरण बदलले आणि भाजप उमेदवार सतीश कुलकर्णी (Satish Kulkarni) यांना मतदान करण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे नितीन भोसले यांनी नाराज होऊन तटस्थ राहणे पसंत केले होते. मध्यंतरी ते शिवसेनेत (Shiv Sena) प्रवेश करणार होते मात्र हा विषय मागे पडला होता. त्यानंतर आता त्यांनी शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीत काम करण्याचा निर्णय घेतला आहे.

नितीन भोसले यांनी मुंबईत (Mumbai) जाऊन प्रवेश केला असून नाशिकमध्ये लवकरच शरद पवार यांच्या उपस्थितीत मेळावा होणार आहे. त्यावेळी अन्य समर्थक प्रवेश करणार असल्याचे नितीन भोसले यांनी सांगितले. मुंबईतील प्रवेश सोहळ्याप्रसंगी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, खासदार अमोल कोल्हे, जिल्हाध्यक्ष कोंडाजीमामा आव्हाड, शहराध्यक्ष गजानन शेलार यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. आधी भाजपाच्या विरोधात लढण्याचा निर्धार करून नंतर भाजपाच्या महापौरपदासाठी मतदान करण्याचा आग्रह धरणाऱ्या मनसे नेत्यांना कंटाळून हा निर्णय घेतला असल्याचे बोलले जात आहे. सध्या निवडणुकांचे वारे असले तर घेऊन पक्षात प्रवेश केलेला नाही. सरकार आल्यास नारपारचे पाणी मिळावे, ऑटोमोबाईल इंडस्ट्री मिळावी, एवढीच मागणी केल्याचे माजी आमदार नितीन भोसले यांनी सांगितले.

हे ही वाचा: 

राज्यभरातील एसटी कर्मचारी पुन्हा एकदा संपावर जाण्याची शक्यता…

राष्ट्रगीताला चुकीच्या पद्धतीने उभी राहिल्याने बॉलिवूडच्या बेबोला केले ट्रोल…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss