दिल्लीतून मोठी बातमी समोर येत आहे. अरविंद केजरीवाल यांच्यावर पदयात्रे दरम्यान हल्ला करण्यात आला आहे. अरविंद केजरीवाल हे दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष आहे. दिल्लीची विधानसभा निवडणूक आता अवघ्या काही दिवसांवर आहे. म्हणून केजरीवाल यांचा प्रचार सुरु आहे. आज शनिवारी त्यांची पदयात्रा सुरु होती. या दरम्यान त्यांच्यावर हल्ला करण्यात आला आहे.
ग्रेटर कैलाश परिसरात केजरीवाल यांच्या पदयात्रेच आयोजन करण्यात आलं होत. यापदयात्रे दरम्यान त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. या हल्ल्यामध्ये केजरीवाल यांना कोणतीही दुखापत झाली नाही आहे. ते पूर्णपणे सुरक्षित आहेत. हल्लेखोराने त्यांच्या अंगावर अज्ञात पदार्थ फेकून हल्ला करण्याचा प्रयत्न केला. या हल्लेखोरांना त्यांच्या सुरक्षा रक्षकांकडून तुरंत ताब्यात घेण्यात आले आहे. या हल्ल्यामागे भाजपचा हात असल्याचं ‘आप’ ने म्हटलं आहे. यावरून आता नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
दिल्ली विधानसभा निवडणूक आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपकडून जोरदार तयारी सुरू आहे. दिल्लीमध्ये केजरीवाल यांच्याकडून पदयात्रा सुरू आहेत. आज अरविंद केजरीवाल यांची पदयात्रा ही ग्रेटर कैलाश भागात होती. पदयात्रा सुरू असताना समोरून आलेल्या एका व्यक्तीने त्यांच्या अंगावर अज्ञात तरल पदार्थ फेकून हल्ल्याचा प्रयत्न केला. भाजपचा हात असल्याचा आरोप केला आहे. ‘आप’कडून भाजपला जबाबदार धरण्यात आलं आहे. त्यामुळे आता नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
हे ही वाचा:
Time Maharashtra आयोजित Strawberry With CM कार्यक्रमात मुख्यमंत्री शिंदेंनी साधला शेतकऱ्यांशी संवाद
स्ट्रॉबेरी पिकाला अनुदान देण्यासाठी शासन प्रयत्नशील – CM EKNATH SHINDE
Follow Us