पाच डिसेंबर रोजी नव्या मंत्रिमंडळाचा शपथविधी झाला. शपथविधीनंतर अनेक दिवस मंत्रिमंडळाचा विस्तार थांबलेला होता. अखेर हिवाळी अधिवेशनाच्या एक दिवसाआधी रविवारी मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आला. मंत्रिमंडळ विस्तारामध्ये एकूण ३९ मंत्र्यांनी शपथ घेतली. ३३ कॅबिनेट तर ६ सहा राज्यमंत्र्यांचा समावेश आहे. यामध्ये भाजपच्या सर्वाधिक १९ मंत्र्यांनी शपथ घेतली, शिवसेनेच्या ११ तर राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या ९ मंत्र्यांनी शपथ घेतली. या मंत्रिमंडळाच्या विस्तारात अनेक नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. त्यामुळे अनेक अनुभवी नेत्यांचा पत्ता कट झाला आहे. अनेक जुने नेते नाराज झाले. त्यामध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांचा देखील समावेश होता. यावेळी छगन भुजबळ यांना देखील मंत्रिमंडळात स्थान मिळू शकलं नाही, त्यामुळे भुजबळ हे चांगलेच नाराज झाले, त्यांनी आपली नाराजी उघडपणे अनेकदा बोलून देखील दाखवली.
अजित पवार यांनी जेव्हा राष्ट्रवादीतून बंड केलं, तेव्हा त्यांच्यासोबत छगन भुजबळ हे देखील होते. अजित पवार यांच्यासोबत तेव्हा ज्या आठ मंत्र्यांनी शपथ घेतली होती, त्यामध्ये भुजबळांचा देखील समावेश होता. मात्र त्यांना यावेळी नव्या मंत्रिमंडळात स्थान मिळू शकलेलं नाहीये, भुजबळ नाराज असतानाच आता आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे.
ती म्हणजे खाते वाटपानंतर नाशिकमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या निवासस्थानाबाहेर त्यांच्या कार्यकर्त्यांकडून कोकाटे यांच्या स्वागताचे बॅनर लावण्यात आले आहेत. मात्र या बॅनरवरून भुजबळांचा फोटो गायब आहे. तर त्यांच्याऐवजी भुजबळ यांचे कट्टर राजकीय विरोधक असे ओळख असलेल्या सुहास कांदे यांचा फोटो लावण्यात आला आहे, त्यामुळे सध्या या बॅनरची जोरदार चर्चा सुरू आहे.
दरम्यान दुसरीकडे छगन भुजबळ हे देखील नाराज असल्याचं समोर येत आहे. यावेळी त्यांना मंत्रिमंडळात संधी मिळू शकलेली नाहीये. यावरून भुजबळांनी नाराजी व्यक्त केली आहे, मुख्यमंत्री फडणवीसांना मी मंत्रिमंडळात पाहिजे होतो, मात्र मला कोणी डावललं त्याचा शोध घ्यावा लागेल असं भुजबळ यांनी म्हटलं.
हे ही वाचा:
Eknath Shinde Live: विधानसभेत मिळालेला विजय ऐतिहासिक, मी कॉमन मॅन म्हणून….काय म्हणाले एकनाथ शिंदे?
लोकसभेच्या निवडणूकीतून आम्ही जे शिकलो तसं महाविकास आघाडीने शिकलं पाहीजे: Chandrashekhar Bawankule