Wednesday, June 7, 2023

Latest Posts

मोठी बातमी, १६ आमदारांच्या अपात्रतेचा उद्या निकाल

आताच्या घडीची मोठी बातमी उद्या लागणार सोळा आमदारांच्या अपात्रतेचा निकालाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. सत्तासंघर्षाच्या निकालासाठी अवघे काही तसाच शिल्लक राहिले आहेत पुढच्या काही तासामध्ये महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा निकाल लागणार आहे.

आताच्या घडीची मोठी बातमी उद्या लागणार सोळा आमदारांच्या अपात्रतेचा निकालाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. सत्तासंघर्षाच्या निकालासाठी अवघे काही तसाच शिल्लक राहिले आहेत पुढच्या काही तासामध्ये महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा निकाल लागणार आहे. या बाबतीत सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांनी ही माहिती दिली आहे. सुप्रीम कोर्टाच्या घटनापीठाकडून हा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे कारण या निकालामुळे राजकीय वर्तुळामध्ये मोठी राजकीय उलथापालथ होण्याची शक्यता आहे.

सर्वाच्च न्यायालयामध्ये दोन्ही पक्षाने आपली बाजू मांडल्यानंतर आता सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश निकाल देणार आहेत. त्यामुळे निकाल काय लागतो याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. सरन्यायाधीश चंद्रचूड म्हणाले, उद्या घटनापीठाकडून दोन प्रकरणांवर निकाल दिला जाणार आहे. शिंदे गट विरुद्ध ठाकरे गट यांच्यामधील वाद सुप्रीम कोर्टात गेला होता. शिंदे गटाचे १६ आमदार अपात्र ठरण्याबाबत ठाकरे गटाने याचिका दाखल केली होती. त्यामुळे या सत्तासंघर्षाच्या लढ्यावर काय निकाल लागणार हे पाहणे फार महत्वाचे ठरणार आहे.

हे ही वाचा : 

The kerala story चित्रपटांवर देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया, सडलेल्या मनाच्या विचारांना….

Karnataka विधानसभा निवडणुकीसाठी आज होणार मतदान, कुणाची सत्ता येणार?

उन्हाळ्यात घरच्या घरी बनवा, घरगुती मसाला ताक

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Latest Posts

Don't Miss