Wednesday, April 17, 2024

Latest Posts

मोठी बातमी!, Nitin Gadkari यांना पुन्हा आली जीवे मारण्याची धमकी

केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी आली आहे.

सध्या राज्यात एकीकडे राजकारण तर दुसरीकडे गुंडप्रवृत्ती वाढल्याचे दिसून येत आहे. चोरी, लूटमार, अल्पवयीम मुलीवर बलात्कार, वादातून खून भांडण याची परिस्थिती वाढत चाललेली आहे.आणि माणसांचा माणसांवरचा विश्वास उडत चाललं आहे. असे वाटते की, आपला आपल्याच राज्यात देशात सेफ आयुष्य जगायला मिळत नाही. त्यामुळेच गुन्हेगारी प्रवृत्ती ही वाढत आहे. नुकतीच आताच्या घडीची आणि त्याच सोबत महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी ही समोर आली आहे. केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी आली आहे.

नितीन गडकरी याना पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी आली आहे. या धमकीमुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चाना उधाण हे आलं आहे. नितीन गडकरी यांच्या दिल्लीतील निवासस्थानी त्यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे नितीन गडकरी यांना जीवे मारण्याची धमकी देण्याची ही तिसरी वेळ आहे. याआधी देखील नितीन गडकरी यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. पोलिसांनी या प्रकरणी काही आरोपींना ताब्यात घेतल्याची माहिती समोर आलेली. पण त्यानंतरही पुन्हा तसाच प्रकार समोर येताना दिसत आहे. गडकरींना पुन्हा धमकीचा फोन आला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

तसेच समोर आलेली माहितीनुसार गडकरी यांच्या दिल्लीतील निवास स्थानी हा कॉल आला होता. हा कॉल त्याच क्षणी याबाबतची माहिती ही पोलिसांना देनाय्त अली होती. सध्या दिल्ली पोलिस या प्रकरणाची गांभीर्याने चौकशी करत आहेत. दिल्ली पोलिसांकडून या प्रकरणी चौकशी सुरु आहे. दिल्ली पोलीस फोन कॉलची चौकशी करत आहेत. पोलीस आरोपींना लवकर बेड्या ठोकतील, अशी आशा व्यक्त केली जात आहे.

परंतु नितीन गडकरी याना हा तिसरा धमकीचा कॉल आला आहे. त्यामुळे इतक्या मोठ्या नेत्याला वारंवार धमकीचे कॉल येत आहे यामध्ये नेमकं काय कारण आहे ? असा प्रश्न सध्या उपस्थित होत आहे तसेच राजकीय वर्तुळात देखील चर्चाना चांगलंच उधाण हे आलं आहे.

हे ही वाचा : 

कुरुलकरांच्या पाठोपाठ निखिल शेंडेही पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेच्या जाळ्यात

Congress मध्ये मतभेद? राहुल यांचा सिद्धरामैय्यांना यांना पाठिंबा तर सोनिया गांधी आहेत शिवकुमारांच्या पाठिशी

Khupte Tithe Gupte च्या पहिल्या भागात कोण येणार पाहिलं? EKNATH SHINDE की RAJ THACKERAY?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Latest Posts

Don't Miss