विधानसभा निवडणूक २०२४ च्या २८८ जागांसाठी मतदानाला आज सकाळी ७ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली होती. तसेच आज मतदान प्रक्रिया पार पडत असून अनेक मतदारसंघात वादावादी, ईव्हीएममध्ये बिघाड आणि तत्सम घटना समोर येत आहेत. अश्यात राज्यामधील बीड जिल्ह्यात विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी चालू असताना काही मतदारसंघात गोंधळ परिस्थिती निर्माण झाली आहे. पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या परळी मतदारसंघातील घाटनांदूर येथे राडा झाल्यास पाहायला मिळालं. त्यानुसार तीन मतदान केंद्रावर मतदान यंत्रणा १ तास बंद होती. याकारणामुळे बीड जिल्ह्यातील मतदानाचा दिवस चांगलाच चर्चेत आला आहे.
बीड मधील राड्यामुळे जिल्हा चर्चेत असतानाच, दुसरीकडे बीड विधानसभा मतदारसंघातून एक दुर्देवी आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. बीड मधील विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार बाळासाहेब शिंदे यांचा मतदान केंद्रावरच हृदयविकाराचा तीव्र झटक्याने मृत्यू झाला आहे. कार्यकर्त्यांनी देखील आपल्या उमेदवाराचा मृत्यू झाल्याने मोठा धक्का बसला आहे. बीड विधानसभा मतदारसंघातून बाळासाहेब शिंदे अपक्ष निवडणूक लढवत होते. यामुळे आज मतदानाच्यादिवशी ते बीड शहरातील छत्रपती शाहू विद्यालयात असणाऱ्या मतदान केंद्रावर थांबले होते. या दरम्यान त्यांना अचानक चक्कर आली आणि ते खाली पडले. त्यानंतर त्यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांना तात्काळ बीड शहरातील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, तिथून त्यांना त्यावेळी छत्रपती संभाजी नगर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मयत घोषित केलं. या घडलेल्या दुर्देवी घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. शिंदे कुंटुंबीयावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तसेच उमेदवार शिंदे यांच्या कार्यकर्त्यानांही या घटनेने मोठा धक्का बसला आहे.
बीडमध्ये चौरंगी लढत
बीडमध्ये विधानसभा मतदारसंघात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना असतानाही दोन अपक्ष उमेदवारांचा अर्ज आल्याने ही निवडणूक चौरंगी होत आहे. संदीप क्षीरसागर यांना राष्ट्रवादी काँग्रेस महाविकास आघाडीकडून उमेदवारी देण्यात आली असून राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीकडून योगेश क्षीरसागर निवडणूक लढवत आहेत. तर या दोन्ही पक्षाच्या उमेदवारांना दोन अपक्षांचे आव्हान असणार आहे. यामध्ये मनोज जरांगे पाटील समर्थक अशी ओळख असलेल्या अनिल जगताप हेही निवडणूक लढवत आहेत. तर, मराठा आरक्षणासाठी दीर्घकाळ लढा देणाऱ्या विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे याही अपक्ष उमेदवार आहेत. तर यावर्षी विधानसभा निवडणुकीत बीडकर कोणाच्या बाजूने मतदान करणार हे पाहावे लागेल.
हे ही वाचा:
Vidhansabha Election: विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीसाठी राज्यात सकाळी ११ वाजेपर्यंत १८.१४% मतदान