राजधानी दिल्ली येथे विधानसभा निवडणुकीसाठी ५ फेब्रुवारीला मतदान पार पडले. आज शनिवारी ८ जानेवारीला मत मोजणी पार पडत आहे. दिल्लीत आप, भाजप, आणि काँग्रेस अशी तिरंगी लढत आपल्याला पाहायला मिळाली. सकाळी आठ वाजेपासून मतमोजणीला सुरवात झाली असून भाजप आणि आतमध्ये काटे की टक्कर पाहायला मिळत आहे. निवडणूक निकालापूर्वी भाजप आणि आप या दोन्ही पक्षांनी दिल्लीत विजयाचा दावा केला आहे. आता मतमोजणी सुरु असतांना मोठा ट्विस्ट समोर आला आहे. अचानक बसपाच्या उमेदवाराने आम आदमी पक्षाला पाठिंबा दिला आहे.
आम आदमी पक्षाचे तीन बडे नेते पोस्टल मतमोजणीत पिछाडीवर असल्याचे पाहायला मिळत आहे. आतिशी मार्लेना, मनिष सिसोदिया आणि माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल पिछाडीवर आहेत. या निवडणुकीत कोण बाजी मारणार? याकडे लक्ष लागलेले असतानाच आता बसपाच्या उमेदवाराने थेट आपच्या उमेदवाराला पाठिंबा दिलाय.
बसपाच्या उमेदवाराचा आपला पाठिंबा
घोंडा विधानसभा मतदारसंघाचे बसपाचे उमेदवार सुंदर लोहिया यांनी मतमोजणी सुरू असतानाही आप उमेदवाराला पाठिंबा दिला आहे. ते म्हणाले की, आम आदमी पार्टीचे उमेदवार गौरव शर्मा यांना माझा पाठिंबा आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या तत्त्वांवर चालणारा पक्ष असेल तर तो आम आदमी पक्ष असल्याचे त्यांनी म्हटले आहे. यामुळे दिल्लीत मतमोजणी सुरु असतानाच बसपाच्या उमेदवाराने ‘आप’ला पाठिंबा दिल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
हे ही वाचा :
Follow Us