Saturday, April 20, 2024

Latest Posts

Maharashtra political Crisis News, सर्वात मोठी बातमी!, शिंदे सरकार बचावलं, उद्धव ठाकरेंचं कोर्टात पराभव

आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी ही समोर आली आहे. अखेर शिंदे सरकार हे बचावल आहे.

आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी ही समोर आली आहे. राज्यासह संपूर्ण देशाचं लक्ष हे आजच्या निकालाकडे लागले होते. अखेर आज निकाल हा लागला आहे आणि शिंदे सरकार हे बचावल आहे. आणि उद्धव ठाकरे गटाचा कोर्टात हा पराभव झाला आहे. उद्धव ठाकरेंनी स्वखुशीनं राजीनामा दिला आहे. त्यांनी राजीनामा दिला नसता, तर सरकार पुन्हा आणलं असतं. सर्वोच्च न्यायालयाचं हे मोठं वक्तव्य आहे.

तसेच तत्कालीन उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी अपात्र ठरवलेल्या १६ आमदारांबाबत सुप्रीम कोर्टाने आज मोठा निर्णय दिला आहे. सुप्रीम कोर्टाने हे प्रकरण विधानसभा अध्यक्षांकडे आज सोपवलं आहे. तर आता या आमदारांचा निर्णय विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे घेणार आहेत त्यामुळे, ते आमदार पात्रच आहेत या गोष्टीवर देखील शिक्कामोर्तब हा झालं आहे. त्यामुळे ठाकरे गटाला मोठा झटका बसला आहे. या निर्णयामुळे एकनाथ शिंदे यांना मोठा दिलासा मिळाला आहे. तसेच आज ५ न्यायमूर्तींच्या घटनापीठाने एकमताने हा निकाल दिला आहे. तर सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी हा निकाल वाचून दाखवला. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड (CJI D Y Chandrachud) यांच्या अध्यक्षतेखालील घटनापीठात न्यायमूर्ती एम आर शाह, न्यायमूर्ती कृष्ण मुरारी, न्यायमूर्ती हिमा कोहली, न्यायमूर्त पी एस नरसिंहा यांचा समावेश आहे.

ठाकरेंच्या बाजूने काय काय?

– प्रकरण ७ न्यायमूर्तींच्या खंडपीठाकडे सोपवण्याची मागणी मान्य
– गोगावलेंची नियुक्ती बेकायदेशीर
– फुटलेला गट बचावासाठी मूळ पक्ष असल्याचा दावा करु शकत नाही

काही महिन्यापूर्वी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षातून काढता पाय घेतला. आणि शिवसेनेत उभी फूट पडली. एकनाथ शिंदे यांच्यासह आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर त्यांनी गुवाहाटी गाठलं. त्यावेळी विधानपरिषदेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी त्यांना अपात्रतेची नोटिस बजावली. ठाकरे गट आणि शिंदे गट असे दोन गट तयार झाले. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा हा दिला आणि त्यानंतर तत्कालीन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी एकनाथ शिंदे यांना सरकार स्थापन करण्यासाठी बोलावले. याबाबत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती.

हे ही वाचा : 

युनेस्कोला बारसूमध्ये कातळ शिल्प सापडली

राज ठाकरेंनी केली मुंबई -गोवा महामार्गाची समृद्धी महामार्गासोबत तुलना

Raj Thackeray यांचा शरद पवरांवर निशाणा, छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव शरद पवार घेत नाहीत

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Latest Posts

Don't Miss