उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले नसते तर शिवसेना फुटली नसती असं काळ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक विधान केले. त्यावर आता शिवसेना उबाठा गटाचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी खुलासा केला आहे. संजय राऊत म्हणाले की, “तुम्ही ज्यांच्या दावणीला धनुष्यबाण आता बांधलेल आहे चोरलेलं ते काही योग्य आहे का? रोज उठून तुम्ही दिल्लीला उठाबशा काढतायत, त्या बाळासाहेब ठाकरे माननीय शिवसेनाप्रमुखांना मान्य आहे का? त्यांना आत्मचिंतनाची गरज आहे. त्यांना जर आत्मचिंतनाला कुठे जायचं असेल, तर कामाख्या मंदिर किंवा अन्य कुठे जायचं असेल तर त्यांनी जावं आणि आत्मचिंतन करावं. आपण मूळ शिवसेनेबाबत जे विधान करतो ते किती तथ्य आणि सत्य आहे. काँग्रेसच्या दावणीला शिवसेना कधीच कोणी बांधली नाही. भारतीय जनता पक्षाने आज जे बसले आहेत त्यांच्याबरोबर त्यांनी शब्द पाळला नाही, त्यांनी बेईमानी केली,” असे संजय राऊत म्हणाले.
पुढे ते म्हणाले की,” त्या निर्णयामध्ये स्वतः एकनाथ शिंदे सहभागी होते. हा सामुदायिक निर्णय होता. त्यांच मत फक्त त्यांना कोणत्या खाते मिळत आहे याच्यावर होतं. त्यांना मुख्यमंत्री व्हायची इच्छा होती. त्यावेळी महाविकास आघाडीच्या एका प्रमुख नेत्याने सांगितलं एकनाथ शिंदे फार जुनियर आहेत, त्यांच्या हाताखाली आम्ही काम करणार नाही. म्हणून एकनाथ शिंदे त्यांच्या बाबतीत विचार होऊ शकला नाही,” असे संजय राऊत म्हणाले.
संजय राऊतांना मविआ तयार करून सरकार बनवलं पाहिजे ही एकनाथ शिंदे यांची भूमिका होती असे विचारले असता ते म्हणाले,”एकनाथ शिंदे विधिमंडळ नेते झाले होते. पण महाविकास आघाडी आज जे त्यांच्याबरोबर बसलेले आहेत. अजित पवार इतर सहकारी यांनी त्यांचा परवा सत्कार केला दिल्लीमध्ये ते स्वतः ज्येष्ठ नेते शरद पवार या सर्वांची भूमिका होती. एक मेसेंजर आम्हाला चालणार नाही, फार ज्युनिअर आहेत, त्यांच्या हाताखाली आमचे वरिष्ठ नेते काम करणार नाही. त्यांनी जर शब्द पाळला असता तर शिंदेच तेव्हा मुख्यमंत्री झाले असते, दुसऱ्या कोणाचा प्रश्नच येत नव्हता. उद्धव ठाकरे त्या बाबतीत प्रामाणिक आहेत.”