महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीची त्सुनामी अवघ्या महाराष्ट्रानेच नाही तर उभ्या देशाने पहिली आहे. त्यात भाजपाची लाट सर्वात मोठी असल्याची दिसून आले. नुकत्याच झालेल्या पत्रकार परिषदेत एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदासाठी सामोपचाराची भूमिका घेतली. पण त्यांना अजून एक पाऊल मागे यावे लागेल असं चित्र दिसत आहे. त्यांच्या ठाण्याच्या बालेकिल्ल्यातच आता भाजपचा पालकमंत्री व्हावा यासाठी फिल्डिंग लागली आहे. पालकमंत्री पदासाठी इच्छुकांची गर्दी झाल्याचे दिसत आहे. त्यात अनेक अनेक नावे समोर येत आहेत.
विधानसभा निवडणुकीत भाजपने ठाणे जिल्ह्यात जोरदार मुसंडी घेतली आहे. ठाणे जिल्ह्यात भाजपचा १०० टक्के स्ट्राईक रेट दिसला. ठाणे जिल्ह्यातील ९ पैकी ९ जागा भाजपने घेतल्या. तर शिंदे सेनेने ७ पैकी ६ जागांवर विजय मिळवला. ठाणे हा एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला समाजाला जातो. पण स्ट्राईक रेटनुसार भाजप येथेही मोठा भाऊ आल्याचा दावा करता आहे. तीन जागा अधिक निवडून आल्याने भाजपने पालकमंत्री पदासाठी दावा केल्याची चर्चा आहे. आता पालकमंत्री म्हणून भाजपचा शिलेदार असावा यासाठी भाजपने दबाव वाढवला आहे.
मुरबाड मतदारसंघातून किसन कथोरे यांनी चौकार ठोकला आहे. ते सलग चौथ्यांदा या विधानसभा मतदारसंघात निवडून आले आहेत. तर रवींद्र चव्हाण यांनी आता ठाणे तर तळकोकणातही मजबूत संपर्कांच्या जोरावर दबदबा वाढवला आहे. दुसरीकडे ठाणे शहराचे आमदार संजय केळकर यांनीदेखील हॅट्रिक केली आहे. त्यांच्या पण नावाची पालकमंत्री म्हणून चर्चा रंगली आहे. ठाण्यात भाजपचा पालकमंत्री झाल्यास तळकोकणापर्यंत त्याचा संदेश जाणार हे निश्चित आहे.
हे ही वाचा:
श्रीकांत शिंदेंची वडील एकनाथ शिंदेंबाबत भावुक पोस्ट!, “बाबा..”