Saturday, June 3, 2023

Latest Posts

मुंबई मनपा निवडणुकीसाठी भाजप अ‍ॅक्शन मोडमध्ये

राज्यातील राजकारणात मोठ्या घडामोडी घडत असतानाच भाजपने आगामी निवडणुकांच्या दृष्टीने हालचाली सुरू केल्या आहेत.

राज्यातील राजकारणात मोठ्या घडामोडी घडत असतानाच भाजपने आगामी निवडणुकांच्या दृष्टीने हालचाली सुरू केल्या आहेत. आगामी महापालिका निवडणुकांसाठी भाजपकडून कंबर कसून तयारी सुरू करण्यात आली आहे. मुंबई महापालिका निवडणूक जिंकण्यासाठी भाजपकडून मिशन १५० ची योजना आखण्यात आली आहे. मिशनच्या अंमलबजावणीसाठी पक्षाच्यावतीने जोरदार प्रयत्न सुरू झाले आहेत. सध्या राज्यात सुरू असलेल्या राजकीय घडामोडी आणि आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मुंबई महापालिकेच्या निवडणुकीला विशेष महत्त्व प्राप्त झालं आहे.

अशातच गेल्या काही दिवसात केंद्रीय मंत्र्यांचे वाढलेले दौरे आणि हालचाली यामुळे भाजप आगामी निवडणुकीसाठी प्रयत्न करत असल्याचे दिसून येत आहे.पक्षाच्या नियोजनानुसार मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महिन्याभरात आढावा घेऊन अनेक पदांची खांदेपालट होण्याच्या चर्चा सुरू आहेत. पक्षाला गरज वाटल्यास अकार्यक्षम पदाधिकाऱ्यांना डच्चू देण्यात येणार आहे. तर वॉर्ड व जिल्हा अध्यक्षही बदलण्यात येणार आहेत. त्यामुळे राजकारणात आता नेमके कोणते बदल होणार आहेत याकडेसगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

राज्याच्या प्रदेश कार्यकारिणी प्रमाणेच मुंबई कार्यकारिणीत देखील महिनाभरात मोठे बदल होणाची चिन्हे दिसून येत आहेत. प्रत्येक मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी भाजपच्याकडून व्यवस्थित नियोजन सुरू आहे. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत सर्वच पक्षांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. या महापालिकेत गेले अनेक वर्ष शिवसेनेची एकहाती सत्ता होती. मात्र आता शिवसेनेत फूट पडून दोन वेगवेगळे गट निर्माण झाल्यामुळे शिवसेना शिंदे गटासोबत युती करून ही महापालिका निवडणूक जिंकण्याचे प्रयत्न भाजपकडून सुरू आहेत. तर दुसरीकडे ठाकरे गटाकडून देखील पुन्हा महापालिकेवर सत्ता मिळवण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत. ही निवडणूक अतितटीची असणार आहे.

हे ही वाचा : 

पायलट – गेहलोत यांच्यतला वाद चव्हाट्यावर

सुषमा अंधारे शरद पवारांबद्दल बोलताना झाल्या भावुक

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Latest Posts

Don't Miss