spot_img
Saturday, March 22, 2025

Latest Posts

उपमुख्यमंत्री शिंदेंच्या बालेकिल्ल्यात भाजपचे मंत्री गणेश नाईकांचा आज जनता दरबार; मोठे शक्तिप्रदर्शन

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात आज भाजप मंत्री गणेश नाईकांचा जनता दरबार. आज ठाण्यात गणेश नाईक यांचा जनता दरबार भरणार असून ठाण्यासह पालघरमध्ये मोठी बॅनरबाजी करत शक्तिप्रदर्शन करण्यात आलं आहे. सकाळी ११ वाजता महाजनवाडी सभागृहात जनता दरबार पार पडणार आहे. शिंदेंच्या बालेकिल्ल्यात आता भाजप आपली ताकद वाढवण्याचा प्रयत्न करत असल्याची चर्चा आहे.

काही दिवसांपूर्वी मंत्री गणेश नाईक यांनी भाजपच्या एका कार्यक्रमांमध्ये आपण दर दोन ते तीन महिन्यांनी ठाण्यात जनता दरबार घेणार असल्याचं सांगितलं होतं. हा जनता दरबार जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी असल्याचं गणेश नाईक सांगत आहेत. असाच आणखी एक कार्यक्रम भाजपने हाती घेतला असून’ आमदार आपल्या दारी’ आगामी ठाणे महापालिका निवडणुकांच्या दृष्टिकोनातून भाजप ठाण्यात शक्तिप्रदर्शन करत असल्याचे दिसून येत आहे. भाजपनेते गणेश नाईक हे राज्याचे मंत्री असून राज्यभरात कुठेही त्यांना जनता दरबार घेता येऊ शकतो. ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे असून पालघरचे पालकमंत्री पद गणेश नाईकांकडे आहे. त्यामुळे ठाण्यातील जनता दरबाराचे उत्तर पालघर मध्ये जनता दरबार घेऊन घेतलं जाईल का याकडे राजकीय वर्तुळातील नेत्यांच्या नजरा आहेत.

 मोठे शक्ती प्रदर्शन

आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजप मंत्री व पालघरचे पालकमंत्री गणेश नाईक ठाण्यात जनता दरबार घेणार आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ला समजला जाणाऱ्या ठाण्यात गणेश नाईक यांचा जनता दरबार असल्याने राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे. ठाण्यासह पालघरमध्ये देखील भाजपकडून मोठी बॅनरबाजी करण्यात आली आहे. जनता दरबारचे शक्ती प्रदर्शन करण्यात आले असून जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी हा दरबार भरवणार असल्याचं शिंदेंचे मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितलं .ठाण्यानंतर पालघर मध्ये ही जनता दरबार घेणार असल्याचे ते म्हणाले .

MSRTC: परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे कर्नाटक संदर्भात महत्त्वाचे आदेश

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss