Saturday, June 3, 2023

Latest Posts

भाजपा हा पराभव सहन करणार नाही,काहीतरी कुरखुड्या भाजप गोट्यातून सुरूच राहतील – पृथ्वीराज चव्हाण

कर्नाटक विधानसभेच्या २२४ मतदारसंघांसाठी १० मे रोजी झालेल्या निवडणुकीची मतमोजणी शनिवारी १३ मे रोजी होणार आहे. मतदानानंतर चाचण्यांचे निष्कर्ष हे काँग्रेसच्या बाजूनेच लागणार आहे हे निश्चितच होते. कारण काँग्रेसने घेतलेल्या भारत जोडो यात्रेचा परिणाम हा या निवडणुकीवर होणार होता हे तर तेव्हाच स्पष्ट झाले होते.

कर्नाटक विधानसभेच्या २२४ मतदारसंघांसाठी १० मे रोजी झालेल्या निवडणुकीची मतमोजणी शनिवारी १३ मे रोजी होणार आहे. मतदानानंतर चाचण्यांचे निष्कर्ष हे काँग्रेसच्या बाजूनेच लागणार आहे हे निश्चितच होते. कारण काँग्रेसने घेतलेल्या भारत जोडो यात्रेचा परिणाम हा या निवडणुकीवर होणार होता हे तर तेव्हाच स्पष्ट झाले होते. कारण राहुल गांधी यांनी या निवडणुकीसाठीच भारत जोडो यात्रेचा प्लॅन आखला असावा असे म्हणायला हरकत नाही. त्यामुळे १० मे ला झालेल्या निवडणुकीचा निकाल हा काँग्रेसच्या बाजूने लागणार असल्याचे दिसून येत आहे. आणि त्यामुळे मोदी सरकार म्हणजेच भाजपाला पराभव पत्करावा लागला आहे. कर्नाटक हे एकमेव राज्य आहे ज्यात त्यांनी तब्बल ३८ वर्षे त्यांनी त्यांची जुनी परंपरा कायम राखली आहे. या निकालाबद्दल देशभरात उत्सुकता पाहायला मिळत आहे.

कर्नाटकात २०१९ साली जेव्हा निवडणूक झाल्या त्यानंतर सोनिया गांधी या प्रथमच निवडणुकीच्या प्रचारासाठी बाहेर पडल्या. कर्नाटक मध्ये निवडणुकीचा मुद्द्यावरून रणधुमाळी पसरत आहे. आमदारांसाठी खास असे रिसॉर्ट बुक करण्यात आले आहे. त्याचबरोबर कर्नाटकातील विधानसभा २०१९ च्या निवडणुकीनंतर सत्तास्थापनेसाठी राजकीय नाट्यमय प्रयोग करण्यात आला होता. महाराष्ट्रात शिंदे फडणवीस सरकार सत्तेवर आले त्याचप्रमाणे कर्नाटकतही भाजपाने सत्ता स्थापन केली होती. याच मुद्द्यावरून काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी भाजपावर टीका केली आहे. “ज्या पापातून कर्नाटक सरकारची निर्मिती झाली, तीच गोष्ट महाराष्ट्राला लागू होते”, असं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले आहेत.

काँग्रेसच्या जाहीरनाम्यातील महत्वाचे मुद्दे पृथ्वीराज चव्हाण यांनी वाचून दाखवले. बेरोजगारी, भाववाढीसह महिलांसाठी अनेक योजनांचे आश्वासन दिल्याने काँग्रेसला यश मिळाल्याचं पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले आहे. त्याचबरोबर दिलेले आश्वासन काँग्रेसने पाळल्याने ते या विजयाचे हकदार आहेत असे देखील पृथ्वीराज चव्हाण म्हणाले. “धार्मिकत्याच्या नावावर राजकारण खपवून घेतले जाणार नाही हा भाजपचा प्रयोग कर्नाटकात लागू होणार नाही असे देखील स्पष्ट मत त्यांनी स्पष्ट केले. ही कर्नाटकातील निवडणूक सगळ्याच दृष्टीने महत्त्वाची निवडणूक होती, त्यामुळे त्याचा परिणाम देशभर होणारच. तसेच दक्षिणेतील राज्यात भाजपासाठी दरवाजा बंद झाला. आता महाराष्ट्राची निवडणूक भाजपाकरता महत्त्वाची असेल”, असंही पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.

भाजपा हा पराभव सहन करणार नाही. काहीतरी कुरखुड्या भाजपच्या सुरूच राहतील याबद्दल काही शंकाच नाही. सरकार खाली खेचलं. तेव्हा प्रचंड मोठा पैशांचा गैरवापर झाला, चौकशी संस्थांचा गैरवापर झाला, पैशांचं आमिष दाखवलं गेलं. ज्या पापातून कर्नाटक सरकारची निर्मिती झाली तीच महाराष्ट्राला गोष्ट लागू होते. सरकार स्थापन करण्याकरता जे व्यवहार करावे लागले, तो खर्च केला गेला, आर्थिक व्यवहार केले, याबाबत आमच्या पक्षाने रेटलिस्ट जाहीर केली होती. याला पुरावा नसतो, पण चर्चा आहे. सत्तास्थापनेसाठी खर्च झालेला पैसा वसूल करण्याकरता वसुली सरकार सुरू झालं. कोणतंही कामं करताना सरकार ४० टक्के कमिशनने काम करतंय,ही ऐकिव माहिती नाही. याविषयी एका कंत्राटदाराने पंतप्रधानांना पत्रेही लिहिले. या पत्रात सरकारचं आणि संबंधित मंत्र्याचंही नाव लिहिलं होतं. मात्र दुर्दैवाने त्या कंत्राटदाराने नंतर आत्महत्या केली”, असं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.

हे ही वाचा:

कर्नाटकात काँग्रेसने आतापर्यंत मारली बाजी, आमदारांसाठी निकालापूर्वीच रिसाॅर्ट केलंय बुक

Karnataka Assembly election 2023, ‘या’ पक्षांना मिळाली NOTA पेक्षाही कमी मतं

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss