महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांचे पुत्र खासदार डॉ. श्रीकांत शिंदे (Dr. Shrikant Shinde) यांचा कल्याण लोकसभा मतदारसंघ सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांचा महाविजय २०२४ संकल्प दौरा डोंबिवलीत सुरु आहे. यादरम्यान, भाजप (BJP) कार्यकर्त्यांनी हा मतदारसंघ भाजपकडे ठेवावा, अशी मागणी केली. कल्याण लोकसभा मतदारसंघावर भाजप कार्यकर्त्यांनी देखील दावा केला आहे. याबाबत चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाजपाच्या कार्यकर्त्यांनी कल्याण लोकसभा मतदारसंघ भाजपला ठेवावा अशी मागणी केली हे खरं असल्याचे सांगितले.
कल्याण-डोंबिवली लोकसभा मतदारसंघ (Kalyan-Dombivali Lok Sabha Constituency) हा भाजपला मिळावा, अशी कार्यकर्त्यांची इच्छा आहे हे खार आज पण त्याबाबतचा निर्णय केंद्रीय पार्लमेंटरी बोर्ड (Central Parliamentary Board) घेणार असल्याचे महत्त्वपूर्ण वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले. यादरम्यान, भाजप कार्यकर्त्यांनी हा मतदारसंघ भाजपकडे ठेवावा अशी मागणी केली. कल्याण लोकसभा मतदारसंघावर भाजप कार्यकर्त्यांनी देखील दावा केला आहे. याबाबत चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाजपाच्या कार्यकर्त्यांनी कल्याण लोकसभा मतदारसंघ भाजपला ठेवावा अशी मागणी केली हे खरं असल्याचे सांगितले. हा मतदारसंघ कोणत्याही पक्षाकडे गेला, तरी ही जागा निवडून आणण्यासाठी भाजपचे कार्यकर्ते सर्वोतोपरी प्रयत्न करतील, असे चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.
जागा वाटपाचा निर्णय घेण्याचे अधिकार एकनाथ शिंदे (Eknath Shinde), देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), अजित पवार (Ajit Pawar) यांच्यावतीने केंद्रीय पार्लमेंटरी बोर्डाला आहेत. केंद्रीय पार्लमेंटरी बोर्डकडून जो निर्णय घेण्यात येईल, तो आम्हाला मान्य असेल. सध्या ही जागा शिवसेनेकडे आहे. ही जागा शिवसेनेकडे गेली तर ५१ टक्के मतांनी खासदार निवडून यावा, याकरता भारतीय जनता पार्टी पूर्ण ताकदीने तयारी करेल.अशी भूमिका चंद्रशेखर बावनकुळे यांनी मांडली.
हे ही वाचा :
नानांसोबत अभिनेते मकरंद अनासपुरे झळकणार ओले आले चित्रपटात
डेंग्यूची लागण नेमकी कशी होते? काय आहेत याची लक्षणे आणि कशी घ्याल काळजी?