छत्रपती शिवाजी महाराज यांची आज १९ फेब्रुवारीला ३९५ वी जयंती आहे. महाराष्ट्रासह देशभरातील अनेक ठिकाणी शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येत आहे. राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मस्थळी किल्ले शिवनेरी येथे छत्रपती शिवरायांचे दर्शन घेऊन त्यांना अभिवादन केले. तर शिवजयंतीच्या निमित्ताने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सोशल मीडियावर मराठीतून पोस्ट शेअर करत शिवरायांना अभिवादन केले आहे. तर बहुचर्चित असलेले राहुल गांधी यांना बहुदा स्मृतिभ्रंश झालेला दिसतोय. त्यांनी त्यांच्या X अकाऊंटवरून शिवरायांना अभिवादन करण्यासाठी एक पोस्ट शेअर केली आहे.
काँग्रेस नेते राहुल गांधी नेहमीच जातीयवादाच्या मुद्द्यांवरून ट्रोल होताना दिसतात. आता राहुल गांधी नवीनच वादात अडकले आहेत. त्यांनी चक्क छत्रपती शिवाजी महाराज यांना जयंतीच्या दिवशी श्रद्धांजली वाहिली आहे. त्यामुळे भाजप आक्रमक झाला आहे. राहुल गांधी यांच्या ट्विटनंतर भाजपने जोरदार टीकास्त्र सोडले आहे. राहुल गांधी यांना या पूर्ण प्रकरणी जाहीर माफी मागायला लावली आहे. नाहीतर थेट कायदेशीर कारवाईचा इशारा देखील दिला आहे.
राहुल गांधी यांनी छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त श्रद्धांजली अर्पण करणारे ट्विट केले आहे. त्यानंतर भाजपने आक्रमक भूमिका घेतली आहे. भाजपने म्हटले आहे की, महाराष्ट्रातील लोकांचा, महापुरुषांचा राहुल गांधी यांच्याकडून सतत अपमान केला जात आहे. जयंतीच्या दिवशी आदरांजली देतात. परंतु राहुल गांधी महाराष्ट्रातील महापुरुषांच्या विषयी कळत नकळत अनादर व्यक्त करतात. त्यातीलच गंभीर प्रकार आहे. त्यांनी तो लवकरच मागे घ्यावा, अन्यथा त्यांना कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशारा भाजपने दिला आहे.