spot_img
Friday, March 21, 2025

Latest Posts

राज ठाकरेंच्या गंगेवरच्या वक्तव्यावर भाजपचा पहिला पलटवार

आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा १९ वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. हा सोहळा पिंपरी चिंचवडमधल्या रामकृष्ण मोरे सभागृहात सोहळा पार पडला आहे. या सोहळ्यातून राज ठाकरे यांनी कुंभमेळाव्यात पवित्र स्नानाची खिल्ली उडवली. राजीव गांधी असल्यापासून गंगा स्वछ होणार हे ऐकत आहे. त्यानंतर राज कपूर यांनी चित्रपट देखील काढला, लोकांना वाटलं गंगा साफ झाली. पण त्यात वेगळी गंगा होती. लोक म्हणाले अशी गंगा साफ असेल तर आम्हीही आंघोळ करायला तयार आहोत. पण गंगा काय साफ व्हायला तयार नाही. या सगळ्या श्रद्धा, अंधश्रद्धेतून बाहेर पडा. आपली डोकी नीट हलवा. तर तसंच बाळा नांदगावकर यांनी आपल्यासाठी तेथील पाणी आणलं असता ते पाणी पिण्यास नकार दिल्याचा खुलासा देखील त्यांनी केला. आता यावरून भाजपने राज ठाकरेंवर पलटवार केलाय.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा (MNS) आज 19 वा वर्धापन दिन असून चिंचवडमधल्या रामकृष्ण मोरे सभागृहात सोहळा पार पडला. या सोहळ्यातून राज ठाकरे यांनी कुंभमेळ्यातील पवित्र स्नानाची खिल्ली उडवली. राजीव गांधी असल्यापासून गंगा स्वच्छ होणार हे ऐकत आहे. त्यानंतर राज कपूर यांनी चित्रपट देखील काढला, लोकांना वाटलं गंगा साफ झाली. पण त्यात वेगळी गंगा होती. लोक म्हणाले अशी गंगा साफ असेल तर आम्हीही आंघोळ करायला तयार आहोत. पण गंगा काय साफ व्हायला तयार नाही. या सगळ्या श्रद्धा, अंधश्रद्धेतून बाहेर पडा. आपली डोकी नीट हलवा, असे त्यांनी म्हटले. तर तसंच बाळा नांदगावकर यांनी आपल्यासाठी तेथील पाणी आणलं असता ते पाणी पिण्यास नकार दिल्याचा खुलासा देखील त्यांनी केला. आता यावरून भाजपच्या राम कदम यांनी राज ठाकरेंवर पलटवार केलाय.

काय म्हणाले राम कदम?

मी स्वतः माझ्या कुटुंबासमोर तीन वेळेस कुंभमेळ्यात पवित्र स्नान केलं आहे. अनेक नेते, अभिनेते, उद्योगपती, साधू-संत सगळेच लोक त्या ठिकाणी पवित्र स्नानासाठी गेले. माझा स्वतःचा अनुभव असा आहे की, देशभरातील 57 कोटी लोक त्या संगमावर आले. तिथले पाणी स्वच्छ होते. त्यामुळे जे गेलेच नसतील त्यांनी घरी बसून पाणी अस्वच्छ असे म्हणणे चुकीचे आहे. त्या 57 कोटी लोकांच्या श्रद्धेवर आपण प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहात, असा पलटवार त्यांनी राज ठाकरे यांच्यावर केलाय.

पुढे ते म्हणाले, मोदी सरकार नद्या स्वच्छ करण्याचा प्रयत्न करत आहे. गंगा नदीत आतापर्यंत लाखो फॅक्टरी आणि गटारांचे आऊटलेट्स होते. आता आपण बऱ्यापैकी ते कमी करत आणले आहे. आपल्याला अजून देखील काही काम करावे लागणार आहे. नद्या स्वच्छ झाल्या पाहिजे हा एक भाग आहे. पण, संगमाचे पवित्र स्नान हा पूर्णपणे श्रद्धेचा भाग आहे. त्याच्यामुळे यावर आरोप-प्रत्यारोप करण्यापूर्वी सनातन हिंदू धर्माच्या श्रद्धेचा सन्मान सर्वांनीच केला पाहिजे, असेही त्यांनी म्हटले आहे.

हे ही वाचा : 

Rahul Gandhi: पक्षातील गटबाजीवर राहुल गांधी यांची तीव्र नाराजी

Santosh Deshmukh Case: संतोष देशमुख हत्याप्रकरणात गोपनीय साक्षीदारान सगळं सांगितलं म्हणाला, भावा म्हणून हाक…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss