spot_img
spot_img
Friday, September 22, 2023
spot_img
spot_img

Latest Posts

ब्रिजभूषण सिंह यांची आयोध्येतील रॅली रद्द, फेसबुक पोस्ट करत दिली माहिती

कुस्तीपटू विरुद्ध भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण सिंह (Brijbhushan Singh) या दोघांमधील वाद संपता संपत नाहीये.

कुस्तीपटू विरुद्ध भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण सिंह (Brijbhushan Singh) या दोघांमधील वाद संपता संपत नाहीये. कुस्तीपटूंच्या समर्थनार्थ आयोजित महापंचायतीचा आज दुसरा दिवस आहे तर दुसरीकडे बाजूला ब्रिजभूषण सिंह यांचा आयोध्यामधील कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे. असे सांगण्यात येत आहे की, ब्रिजभूषण सिंह यांनी आयोजित केलेल्या रॅलीमध्ये ११ लाख लोक सहभागी होणार असल्याचा दावा त्यांनी केला होता. ब्रिजभूषण सिंह यांच्यावर कुस्तीपटूंनी केलेल्या आरोपांमुले सध्या सर्वाच्च न्यायालयामध्ये सुनावणी सुरु आहे. त्यामउळे आता सर्वाच्च न्यायालयाने त्यांना कठोर निर्देश दिले आहेत.

ब्रिजभूषण सिंह यांचे अनेक कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. अयोध्येतील रामकथा पार्कमध्ये बृजभूषण सिंह यांच्याकडून जन चेतना महारॅलीचे आयोजन करण्यात आले होते परंतु आता ते सर्वाच्च न्यायालयाच्या निर्देशांमुळे ही रॅली देखील रद्द करण्यात आली आहे. ही सर्व माहिती ब्रिजभूषण सिंह यांनी त्यांच्या फेसबुक पेज वरून दिली आहे. पोस्टमध्ये ब्रिजभूषण सिंह यांनी लिहिले आहे की, तुम्हा सर्वांचा पाठिंबा मिळाल्यामुळे मी मागील २८ वर्ष लोकसभेचा सदस्य म्हणून लोकांची सेवा करत आहे. मी सत्तेमध्ये आणि विरोधात देखील असतो. त्याचबरोबर मी सर्व जातीधर्माच्या लोकांना एकत्र आणण्याचा प्रयत्न देखील करतो. असे ब्रिजभूषण सिंह यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हंटले आहे.

ब्रिजभूषण सिंह यांनी पुढे लिहिताना म्हटले आहे की, माझ्यावर विरोधातील काही राजकीय पक्षांनी खोटे आरोप लावले आहेत. सध्याच्या स्थितीमध्ये काही राजकीय पक्ष राजकारणासाठी अनेक ठिकाणी रॅली आणि कार्यक्रमांचे आयोजन करून प्रांतवाद, क्षेत्रवाद आणि जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. या सर्व कारणांमुळे ५ जून रोजी अयोध्यामध्ये संत संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे त्यामुळे आपल्या समाजातून वाईट प्रवृत्ती दूर होण्यास मदत होईल असे ब्रिजभूषण सिंह म्हणाले.

हे ही वाचा:

SSC 10th Result 2023, यंदा इयत्ता दहावीचा राज्याचा निकाल लागला 93.83 टक्के

Sharad Pawar – Eknath Shinde यांच्या भेटीवर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया

शिवराज्याभिषेक दिनानिम्मित Raj Thackeray यांनी केली पोस्ट शेअर, माझी एक तीव्र इच्छा…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss