spot_img
Wednesday, March 19, 2025

Latest Posts

Budget session: सत्ताधाऱ्यांच्या चहापानावर विरोधकांचा बहिष्कार; महाविकास आघाडीची पत्रकार परिषद

अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पुर्वसंध्येला महाविकास आघाडीने आज पत्रकार परिषद घेऊन सायंकाळी होणाऱ्या चहापाण्यावर बहिष्कार टाकून विरोधकांनी आपली भूमीका स्पष्ट केली आहे. उद्यापासून राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होणार आहे. हे अर्थसंकल्पीय अधिवेश वादळी ठरण्याची शक्यता आहे. राज्यातील विविध मुद्द्यांवरून विरोधक सरकारची कोंडी करण्याची शक्यता आहे.

MVA Meeting: अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पुर्वसंध्येला महाविकास आघाडीने आज पत्रकार परिषद घेऊन सायंकाळी होणाऱ्या चहापाण्यावर बहिष्कार टाकून विरोधकांनी आपली भूमीका स्पष्ट केली आहे. उद्यापासून राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होणार आहे. हे अर्थसंकल्पीय अधिवेश वादळी ठरण्याची शक्यता आहे. राज्यातील विविध मुद्द्यांवरून विरोधक सरकारची कोंडी करण्याची शक्यता आहे. दरम्यान अधिवेशनापूर्वी आज सत्ताधाऱ्यांकडून चहापानाच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येणार आहे, चहापानाच्या कार्यक्रमावर विरोधकांकडून बहिष्कार घालण्यात आला आहे. अधिवेशनाच्या आधीच आज महाविकास आघाडीची महत्त्वाची पत्रकार परिषद पार पडली, या पत्रकार परिषदेला राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड, शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबदास दानवे आणि आदित्य ठाकरे यांची उपस्थिती होती. यावेळी बोलताना अंबदास दानवे यांनी महायुती सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे.

संतोष देशमुखांची हत्या, त्यात वाल्मिक कराडचा सहभाग, पुण्यातील तरुणीवर झालेले अत्याचार, त्यावर गृहराज्यमंत्र्यांनी केलेले वक्तव्य, कोर्टाने दोषी ठरवल्यानंतर कृषी मंत्रिपदावर कायम ठेवण्याचा प्रकार, महापुरूषांबाबत झालेली वादग्रस्त वक्त्यव्य, लाडक्या बहीणींची योजनेतू बाहेर काढण्याचा प्रकार, शिंदे सरकारमधील मंत्र्यांनी घेतलेल्या निर्णयाला फडणवीसांनी दिलेली स्थगिती, या आणि या सारख्या अनेक मुद्द्यांच्या अधारावर महायुती सरकारला घेरण्याची तयारी विरोधकांनी केली आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पुर्वसंध्येला आयोजित पत्रकार परिषदेत विरोधकांनी आपली भूमीका स्पष्ट केली. शिवाय सत्ताधाऱ्यांच्या चहापानावरही बहीष्कार टाकला. विरोधकांच्या आक्रमक भूमीकेमुळे अधिवेशनात सत्ताधाऱ्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी, सरकारमध्ये विसंवाद आहे. कृषी मंत्र्यांना कोर्टाने दोषी ठरवलं तरी त्यांना पदावरून हटवलं नाही. सुनिल केदार यांच्यावर दुसऱ्या क्षणाला कारवाई करण्यात आली होती. याची आठवण यावेळी दानवे यांनी केली. मग कृषी मंत्री असलेल्या माणिकराव कोकाटेंवर का नाही असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराड याला व्हिआयपी ट्रिटमेंट दिली जात आहे असा आरोपही यावेळी दानवे यांनी केला. कृष्णा आंधळेला अजूनही कसे पकडले गेले नाही असंही ते म्हणाले. महिलांवरील अत्याचारात तर मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यावर सरकारचे कोणतेही नियंत्रण नाही. नुकतीच स्वारगेटमध्येही अशीच घटना घडली. त्याबाबत गृहराज्यमंत्र्यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं. त्यांना मंत्रिमंडळात राहाण्याचा कोणताही अधिकार नाही असंही दावने म्हणाले. माजी कृषीमंत्री धनंजय मुंडे यांचे घोटाळे बाहेर येत आहेत. ते अतिशय भयंकर आहे. शिवाय बीडमधील गुन्हेगारीत कोणाचा हात आहे हे ही समोर आले आहे. अशा स्थितीत हे लोक मंत्रिमंडळात कसे असा प्रश्नही दानवे यांनी उपस्थित केला. प्रशांत कोरटकर, राहुल सोलापूरकर हे महापुरूषांचा अपमान करत आहेत. अशा लोकांना सरकार संरक्षण देत आहेत. महापुरूषांचा अपमान करण्याची परंपरा तत्कालीन राज्यपाल कोश्यारी यांनी सुरू केली होती. तिच परंपरा या सरकारने कायम ठेवली आहे असा आरोप त्यांनी यावेळी केला. अशा लोकांना जेलमध्ये टाकलं पाहीजे असंही ते म्हणाले.

पालकमंत्री पदाचा वाद अद्यापही सुटलेला नाही. हा वाद सोडवण्यासाठी एका बैठकीला मुख्यमंत्री जातात तर उपमुख्यमंत्री जात नाहीत. या सरकारमध्ये कुठलाही समन्वय नाही. त्यामुळे अशा सरकारच्या चहापानाला न जाण्याचा निर्णय विरोधकांनी घेतला आहे असं त्यांनी सांगितलं. तर आज राज्यात परिस्थिती अशी आहे की, गुन्हेगारी करा, भ्रष्टाचार करा, अपमानजनक बोला, तुम्हाला लगेच वरची पद मिळतील. देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र कुठे नेऊन ठेवला आहे. अशी विचारणा काँग्रेस नेते भाई जगताप यांनी केली. तर मुख्यमंत्री विरोधकांबरोबर संवाद ठेवत नाहीत. सत्तेचा माज आणि माग्रुरी चेहऱ्यावर दिसून येत आहे. महाराष्ट्रची राजकीय संस्कृती आहे, ती बदलत चालली आहे. जोपर्यंत विरोधकांना त्यांचा जो मान आहे, तो दिला जात नाही तोपर्यंत सत्ताधाऱ्यांबरोबर बसणं आम्हाला शक्य नाही. असं जितेंद्र आव्हाड म्हणाले.

हे ही वाचा:

Raksha Khadse: केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीसोबत धक्कादायक प्रकार

Dhananjay Munde: अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दोन दिवसांपूर्वीच धनंजय मुंडेंचा अजित पवारांकडे राजीनामा ; करूणा मुंडेंचा मोठा दावा

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

 

Latest Posts

Don't Miss