spot_img
spot_img
Friday, September 22, 2023
spot_img
spot_img

Latest Posts

१९ जूनच्या आधी होणार मंत्रिमंडळ विस्तार?, ‘मिशन ४५’ला फायदा होईल अशांनाच मंत्रिपद?

महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाबाबत सर्वोच्च न्यायालयाने अंतिम निकाल दिल्यानंतर आता शिंदे-फडणवीस सरकारमध्ये मंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचाली सुरु झाल्याचे संकेत मिळत आहेत.

महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाबाबत सर्वोच्च न्यायालयाने अंतिम निकाल दिल्यानंतर आता शिंदे-फडणवीस सरकारमध्ये मंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचाली सुरु झाल्याचे संकेत मिळत आहेत. राज्यामध्ये शिंदे-फडणवीस सरकार स्थापन होऊन वर्ष झालं तरी अद्याप मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. तसेच राज्यात गेल्या अनेक दिवसांपासून मंत्रिमंडळाच्या चर्चाना मात्र चांगलंच उधाण हे आलं आहे. अश्यातच दिनांक १९ जून रोजी मंत्री मंडळाचा विस्तार होईल असं देखील म्हंटल जात आहे. त्यामुळे आता नेमकं काय होणार या गोष्टीकडे सर्वांचं लक्ष हे लागलं आहे.

दिनांक १९ जून रोजी शिवसेनेचा वर्धापन दिन आहे. त्यामुळे १९ जूनच्या आधी मंत्रीमंडळाचा विस्तार हा होऊ शकतो अशी शक्यता देखील मोठ्या प्रमाणात वर्तवली जात आहे. सध्या बैठकीचे सत्र देखील वाढत चालले आहे. तर दुसरीकडे काल दिनांक ४ जून रोजी रात्री उशिरा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंद आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची बैठक झाली.

काल दिनांक ४ जून रोजी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पुण्यातील कार्यक्रम आटोपून दिल्लीकडे रवाना झाले. तर दुसरीकदे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सायंकाळी नागपूरमधील कार्यक्रम आटोपून दिल्लीला रवाना झाले. रात्री १० वाजता उभय नेत्यांनी देशाचे गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. तिघांमध्ये दीड तासांहून अधिक वेळ चर्चा झाल्याची माहिती देखील समोर आली आहे.

तसेच या मंत्रीमंडळाच्या विस्तारामध्ये नव्या चेहऱ्यांना संधी मिळणार असल्याची माहिती मिळत आहे. जे आमदार आक्रमकपणे आणि अभ्यासूपणे सरकारची बाजू मांडत आहेत, त्यांना मंत्रिपदं मिळू शकतात असं देखील म्हंटल जात आहे. भाजपच्या ‘मिशन ४५’ला फायदशीर ठरेल अशांना मंत्रिपदं मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अमित शाह यांनी संभाव्य मंत्र्यांची सर्व माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून घेतल्याचं कळतंय. त्यामुळे आता लवकरच मंत्रिमंळाचा विस्तार होऊ शकतो अशी शक्यता देखील वर्तवली जात आहे.

हे ही वाचा : 

Watch Video, Odisha Train Accident नंतर तब्ब्ल ५१ तासानंतर पहिली ट्रेन धावली, अन् रेल्वेमंत्र्यांनी जोडले हात

‘या’ ५ संकल्पांचे करा पालन आणि World Enviroment Day 2023 करा साजरा…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss