Monday, June 5, 2023

Latest Posts

एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देऊ शकतात?

महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाच्या सुनावणी पूर्ण झाली झाली असून सुप्रीम कोर्टाने काही निर्णय राखून ठेवला आहे. तब्बल ९ महिन्यांच्या युक्तिवादानंतर महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा फैसला नक्की काय लागणार याकडे देशाचे लक्ष लागून राहिले आहे. यादरम्यान राज्यातील सत्तासंघर्षावर ११ मे किंवा १२ मे २०२३ रोजी निकाल लागण्याची शक्यता राज्याच्या राजकारणात वर्तवली जात आहे.

महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाच्या सुनावणी पूर्ण झाली झाली असून सुप्रीम कोर्टाने काही निर्णय राखून ठेवला आहे. तब्बल ९ महिन्यांच्या युक्तिवादानंतर महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा फैसला नक्की काय लागणार याकडे देशाचे लक्ष लागून राहिले आहे. यादरम्यान राज्यातील सत्तासंघर्षावर ११ मे किंवा १२ मे २०२३ रोजी निकाल लागण्याची शक्यता राज्याच्या राजकारणात वर्तवली जात आहे. दरम्यान या सत्तासंघर्षाच्या निकालाबाबत कायदेतज्ज्ञ ॲड. असीम सरोदे यांनी काही शक्यता वर्तवल्या आहेत. त्यांनी ट्वीट करत महाराष्ट्र सत्तासंघर्ष प्रकरणी निकाल ११ किंवा १२ मे २०२३ ला लागेल. तसेच निकालात काय निर्णय होईल याबद्दल काही शक्यता बोलून दाखवल्या आहेत. ॲड. असीम सरोदे यांनी निकाल काय असेल याबाबत केवळ काही कायदेशीर शक्यता व्यक्त करता येऊ शकतात असं म्हटलं आहे.तर या संपूर्ण घटनेसह १६ आमदार अपात्र ठरले तर काय होईल आणि आताचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राजीनामा देऊ शकतील का यावर ॲड. असीम सरोदे यांनी सविस्तर भाष्य केलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जरी अपात्र ठरले तरी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री राहू शकतात कारण त्यांच्याकडे बहुमत आहे अशा चर्चा आहेत. त्यामुळे उद्या राजकारणाऱ्यांची परीक्षा असणार हे निश्चित.

मुख्यमंत्री स्वत: जर अपात्र ठरले तर सरकार कोसळेल. त्यानंतर नवीन सरकार स्थापन करावं लागेल. त्यामुळे एक शक्यता आहे की, या केसचा भाग नाही पण त्याचा परिणाम म्हणून किंवा त्यांना(शिवसेनेतील आमदारांना) अंदाज आला की, आपण अपात्र होणार तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे निकाल लागण्याआधी राजीनामा देऊ शकतात असं सरोदे यांनी सांगितलं आहे. त्यावर कायदेतज्ञ असीम सरोदे म्हणाले की, “१६ जण अपात्र ठरले तरी २१ जणांची देखील याचिका आहे. त्यामुळे जवळपास एकनाथ शिंदे यांच्यासोबतचे सर्वजण अपात्र ठरतील. लोकांना वाटतं की, अपात्र झालेले आमदार ६ वर्ष कोणतीही निवडणूक लढवू शकत नाही. असं देखील सरोदे म्हणाले. पण ही मागणी आम्ही मतदारांकडून केली आहे. जे अपात्र ठरतील त्यांना पुढची 6 वर्षे कोणतीही निवडणूक लढवू देऊ नका. पण असं काही होऊ शकत नाही असंही पुढे सरोदे म्हणालेत.तर ‘येत्या निवडणुका अपात्र ठरलेले आमदार लढवू शकतील. पण त्यांचं सरकार कायम राहील हे म्हणणं धाडसाच आहे. कारण हे लोक अपात्र ठरले तर बहुमताचा आकडा कमी होईल. त्यामुळे नवीन गठबंधन होऊन नवीन युती निर्माण होऊन एखादं सरकार स्थापन होऊ शकेल. परंतु एकनाथ शिंदे यांच्या सरकारला धोका नाही म्हणणं चुकीच आहे असंही ते म्हणालेत.

हे ही वाचा : 

पायलट – गेहलोत यांच्यतला वाद चव्हाट्यावर

आमदार मेघना बोर्डीकर यांना ‘भारत गौरव पुरस्कार’ जाहीर

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

 

Latest Posts

Don't Miss