राज्यातील सुमारे २ हजार ३५९ ग्रामपंचायतींसाठी प्रचार शुक्रवारी संध्याकाळी थांबले. त्यानंतर ग्रामपंचायत उमेदवार विजयाच्या आराखडे तयार करु लागले. आजचा दिवशी आणखी छुपा प्रचार सुरुच राहणार आहे. त्यानंतर रविवारी ५ नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे, तर सोमवारी या निवडणुकांचा निकाल लागणार आहे. यापूर्वीच सोलापूर जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. सांगोला तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणूकीत उमेदवारी करणाऱ्या व्यक्तीला ह्रदयविकाराचा झटका आला. त्या झटक्याने त्याचा मृत्यू झाला. त्यामुळे सांगोला तालुक्यातील या ठिकाणी निवडणूक प्रक्रिया स्थगित करण्यात आली आहे. मतदानाच्या ऐन एका दिवसापूर्वी घडलेल्या या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.
सांगोला तालुक्यातील चिक महूद ग्रामपंचायतीत घडली ही दुर्दैवी घटना
सांगोला तालुक्यातील चिक महूद ग्रामपंचायतची निवडणूक रविवार ५ नोव्हेंबर रोजी होणार आहेत . इतर ग्रामपंचायतीप्रमाणेच या ठिकाणी देखील प्रचार चांगलाच रंगला होता. शुक्रवारी निवडणुकांचा प्रचार थंडावल्यानंतर उमेदवार थोडे निवांत झाले होते. विजयासाठी अधिक वजाबाकीचे गणित करतच होते. यावेळी ही ग्रामपंचायत निवडणूक लढवत असलेले उमेदवार किसन सोपान यादव यांना हृदयविकाराचा झटका आला व त्यात त्यांचा मृत्यू झाला. उमेदवार असलेले किसन यादव यांना त्रास जाणवू लागला व त्यानंतर तातडीने त्यांना रुग्णालयात नेण्यात आले, परंतु उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.
शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून निवडणुकांसाठी मैदानात उतरले होते
उमेदवार असलेले किसन यादव हे उद्धव ठाकरे यांची शिवसेना व शेकाप यांच्या तामजाई देवी परिवर्तन ग्रामविकास आघाडी कडून निवडणूक लढवणार होते. अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव असलेल्या जागेवरुन ते निवडणूक लढवत होते, पण प्रचाराच्या शेवटच्या दिवशी मृत्यू झाला. त्यामुळे सांगोला तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे. किसन यादव यांचा मृत्यू झाल्यामुळे प्रभाग पाचमधील अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव सदस्य पदाची निवडणूक प्रक्रिया स्थगित केली आहे. कारण, एखाद्या उमेदवाराचे निधन झाल्यास त्या ठिकाणची निवडणूक प्रक्रिया स्थगित करण्याचा निर्णय निवडणूक आयोगाकडून घेतला जातो.
हे ही वाचा :
खंडणीसाठी चौथ्यांदा मेल, मुकेश अंबानी यांच्या जीवाला पुन्हा एकदा धोका
कर्जमुक्त भारत अभियान म्हणजे काय? जाणून घ्या
Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.