आज दि. २६ नोव्हेंबरला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे राजभवनात दाखल झाले. यानंतर अखेर एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. या तिन्ही मंत्र्यांनी राजभवनात राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांची भेट घेतली. यावेळी एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देत असल्याचं पत्र त्यांच्याकडे सोपवलं आहे. यावेक दीपक केसरकर, दादा भुसे हेदेखील उपस्थित होते. शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला असला तरी जोपर्यंत नवीन सरकार येत नाही तोपर्यंत एकनाथ शिंदे हेच काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून कार्यभार सांभाळणार आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आपल्या पदाचा राजीनामा देण्यासाठी राजभवनात दाखल होण्याआधीच देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार राजभवनात पोहचले होते. यावेळी अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस एकत्र बसून चर्चा करत होते. एकनाथ शिंदे राजभवनात दाखल होताच अजित पवारांनी आपल्या खुर्चीवरून देवेंद्र फडणवीसांनाएकनाथ शिंदेंच्या बाजूला बसवले. देवेंद्र फडणवीस हे अजित पवारांच्या बाजूला बसत होते तर अजित पवार स्वतः बाजूला झाले आणि देवेंद्र फडणवीसांना एकनाथ शिंदेंच्या बाजूला बसण्यासाठी जागा दिली. याच दरम्यान एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात मुख्यमंत्रीपदावरून नाराजी असल्याची चर्चा सुरु आहे. तर एकनाथ शिंदेंच्या बाजूला देवेंद्र फडणवीसांना बसवून अजित पवारांनी योग्य संधी साधल्याचे चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
आज २६ नोव्हेंबरला मुंबईतील अतिरेकी हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली देण्याच्या शासकीय कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकत्र आले होते. मात्र या कार्यक्रमादरम्यान या दोन्ही नेत्यांनी एकत्र येण्याचे टाळल्याचे चित्र समोर आले. यामागे मुख्यमंत्रीपद हे कारण असू शकते का? असाही प्रश्न सध्या राजकीय वर्तुळात सुरु आहे.
हे ही वाचा:
राजभवनातून बाहेर पडल्यावर Deepak Kesarkar यांची प्रतिक्रिया; म्हणाले,”नवीन सरकार लवकरच…”
Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.