spot_img
Saturday, February 8, 2025

Latest Posts

चंद्रकांत खैरे व्यासपीठावरच नतमस्तक झाले…

विधानसभा निवडणुकांमध्ये महायुतीचा मोठ्या बहुमताने विजय झाला तर महाविकास आघाडीचा दारुण पराभव झाला. पराभवानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढणार असल्याची मोठी घोषणा ठकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली आहे. या घोषणेनंतर शिवसेना ठाकरे गटात राजकीय घटनांना वेग आला आहे. उद्धव ठाकरेंची साथ सोडू नका अशी हाक देत माजी खासदार चंद्रकांत खैरे कार्यकर्त्यांसमोर भर व्यासपीठावरच नतमस्तक झाल्याचे पाहायला मिळाले आहे.

छत्रपती संभाजीनगरच्या संत एकनाथ रंगमंदिर येथे ठाकरे गटाच्या कारकर्त्यांची आणि पदाधिकाऱ्यांचा शनिवारी मेळावा आयोजित करण्यात आला होता. विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे यांच्या उपस्थितीत हा मेळावा पार पडला. यावेळी पक्षाला सोडून जाणाऱ्या कार्यकर्त्यांना उद्धव ठाकरेंची साथ सोडू नका असं म्हणत हात जडून कार्यकर्त्यांसमोर चंद्रकांत खैरे नतमस्तक झाले.

नेमकं काय म्हणाले चंद्रकांत खैरे?
मी हात जोडून विनंती करतो. तुम्हाला इथं दंडवत घालतो, उद्धव ठाकरेंकडे आपल्याला पहायचंय. परवाच्या कार्यक्रमात ते किती कळकळून बोलले. मी तुम्हाला विनंती करतो, कुठेही सोडून जाऊ नका. एकत्र मिळून काम करू. माझं काही चुकलं तर मला बोललात तरी हरकत नाही. माझी विनंती अशी आहे थांबा.. असं म्हणत चंद्रकांत खैरेंनी व्यासपीठावर कार्यकर्त्यांना दंडवत घातलं. उद्धव साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण महापालिका निवडणूका, जिल्हा परिषद निवडणूका निवडून येऊ असे खैरे म्हणाले.

Latest Posts

Don't Miss