Thursday, April 25, 2024

Latest Posts

चंद्रपूरचे काँग्रेसचे खासदार बाळू धानोरकर यांचं निधन

चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती गावचे स्थायिक बाळू धानोरकर हे मुळचे शिवसैनिक. स्थानिक पातळीवर जम बसवल्यानंतर त्यांनी शिवसेनेकडूनच त्यांना आमदारकी मिळवली.

चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती गावचे स्थायिक बाळू धानोरकर हे मुळचे शिवसैनिक. स्थानिक पातळीवर जम बसवल्यानंतर त्यांनी शिवसेनेकडूनच त्यांना आमदारकी मिळवली. संघटना मजबूत करत चंद्रपूरमध्ये धानोरकरांनी शिवसेना बळकट केली. तर, २०१९ च्या निवडणुकीत बाळू धानोरकर यांना काँग्रेसमधून खासदारकीचं तिकिट मिळालं. त्यामुळे त्यांनी शिवसेनेला रामराम ठोकून काँग्रेसमध्ये प्रवेश केला. लोकसभा मतदारसंघातही त्यांनी आपला पाया रोवला होता. त्यांच्या विरुद्ध कोणीच उभे राहायचे धाडस करायचे नाहीत. ते राज्यातील काँग्रेसचे एकमेव खासदार होते. भाजपाच्या बालेकिल्ल्यात त्यांनी काँग्रेसचा झेंडा फडकवला. एवढंच नव्हे तर, पत्नी प्रतिभा धानोरकर यांनाही विधानसभेत निवडून आणले.

गेल्या काही दिवसांपासून बाळू धानोरकर रुग्णालयात उपचार घेत होते. काँग्रेसचे खासदार सुरेश उर्फ बाळू धानोरकर यांची आज प्राणज्योत मालवली आहे. दिल्लीतील मेदांता रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला असून एअर अॅम्ब्युलन्सद्वारे त्यांचं पार्थिव हे त्यांच्या निवासस्थानी आणण्यात येणार असल्याचे समोर आले आहे. खासदार बाळू धानोरकर यांचे वडिल नारायण धानोरकर यांचं चार दिवसांपूर्वीच निधन झाले आहे. त्यांच्या पार्थिवाचं दर्शन बाळू धानोरकरांनी घेतलं. परंतु, प्रकृती अस्वास्थतेमुळे ते अंतिम संस्काराला जाऊ शकले नाही. त्यांच्या पश्चात पत्नी वरोराच्या आमदार प्रतिभा धानोरकर, दोन मुले, आई, भाऊ भद्रावतीचे नगराध्यक्ष अनिल धानोरकर, बहीण व बराच मोठा आप्त परिवार आहे.  

बाळू धानोरकर हे चंद्रपूरचे काँग्रेसचे खासदार होते. त्यांचं वय हे अवघ ४७ वर्षाचे होते. काँग्रेसचे राज्यातील ते एकमेव खासदार होते. काही दिवसांपासून बाळू धानोरकरआजारी होते. नागपुरात खासगी रुग्णालयात त्यांच्यावर किडनी स्टोन शस्त्रक्रियाही झाली. शस्त्रक्रियेदरम्यान गुंतागुंत वाढल्याने २८ मे रोजी त्यांची प्रकृती बिघडली. त्यामुळे एअर अॅम्ब्युलन्सद्वारे त्यांना नागपूरहून दिल्लीत उपचारांसाठी हलवण्यात आले. दिल्लीत त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. अखेर, आज पहाटेच उपचारांदरम्यान त्यांचं निधन झालं. खासदार बाळु धानोरकर यांचे पार्थिव वरोरा येथील निवासस्थानी दुपारी २ ते ४ वाजेपर्यंत अंतिम दर्शनाकरिता ठेवण्यात येणार आहे. अंतिम संस्कार वरोरा येथील वणी बायपास स्मशानभूमी येथे होईल.

हे ही वाचा:

येलो आर्मी Indian Premier league 2023 चा विजेता

Vat Pournima 2023: वटपौर्णिमेनिमित्त अशा पद्धतीने सजवा पूजेचे ताट

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss