काल दिनांक २४ ऑक्टोबर २०२३ रोजी मुंबईमध्ये दोनदसरा मेळावे हे पार पडले. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आझाद मैदान परिसरात दसरा मेळावा घेतलं तर ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवाजी पार्क परिसरात दसरा मेळावा हा घेतला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी सरकरवर जोरदार हल्लाबोल हा केला आहे. तसेच भाजपा वर देखील चांगलाच हल्लाबोल हा केला आहे. या संदर्भात आज भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी चांगलाच टोला हा लगावला आहे. उद्धव ठाकरे हे शरद पवारांच्या रुग्णालयात गेल्याने त्यांना विस्मृतीचा आजार जडला आहे. उद्धव ठाकरेंचं भाषण हे इंडिया आघाडीच्या प्रवक्त्याचं भाषण होतं असं म्हणत भाजपाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंच्या भाषणावर टीका केली आहे.
तसेच माध्यमांशी बोलत असताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले आहेत की, रटाळ भाषण होते, देश मोदींना कुटुंब मानतोय, मोदींना परिवाराचा प्रमुख अशी भावना आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंनी काहीही म्हटलं तरी, इंडिया आघाडीत उद्धव ठाकरे गेले आहेत, त्यामुळे ते शरद पवार आणि काँग्रेसचे वकील आहेत. उदय स्टालिन यांच्या वक्तव्यावर खुलासा उद्धव ठाकरे यांनी केला नाही. स्टालिन यांच्यासोबत जाऊ हे पुन्हा रेटून सांगितले. विकासाचे मुद्दे उद्धव ठाकरेंकडे नाही, व्हिजन लेस व्यक्ती राजकारणात असताना जनतेला कन्फ्युज करत आहे.खरं तर उद्धव ठाकरे हे शरद पवारांच्या हॉस्पिटलमध्ये जाऊन बिघडले आहेत, त्यांना काही आठवत नाही. कालचे इंडिया आघाडीच्या प्रवक्त्यांचे भाषण होते. विकासाचे उद्धव ठाकरेंना काय कळत नाही. २०४७ पर्यंत सर्वांनी वाट बघावी. बेईमानी करून मुख्यमंत्री पद मिळवले असं देखील बावनकुळे म्हणाले आहेत.
तसेच पुढे चंद्रशेखर बावनकुळे यांनी निलेश राणे यांच्या वर देखील प्रतिक्रिया ही दिली आहे. जीवनात अशी घटना होते, जेंव्हा काहीशी निराशा येते. . मी स्वतः रत्नगिरीत जाऊन आलो, अस काही नाही आहे. निलेश राणे चांगला नेते आहेत.पुढे ते म्हणले आहेत की, पंकजा मुंडे यांच्या रक्तात भाजप आहेत. त्यांच्या बोलण्यात काही वेगळे नाही. पक्ष योग्य निर्णय करेल. केंद्रीय नेतृत्व योग्य निर्णय करेल. त्या आमच्या नेत्या आहेत. भाजप त्यांच्या मागे उभा आहे.
हे ही वाचा :
पुण्यातील कोयता गॅंगने हॉटेल चालकावर केला हल्ला
बावनकुळेंच्या वक्तव्यानंतर श्रीकांत शिंदेंची धाकधूक वाढली
Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा .