आज ५ डिसेंबरला आझाद मैदानावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पदाचा शपथविधी सोहळा पार पडला. सर्व नामवंत मान्यवरांच्या उपस्थित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी शपथ घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री अमित शाह, भाजप पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डा तसेच अनेक राजकीय नेते, क्रीडापट्टू, चित्रपट सृष्टीतील कलाकार आणि अनेक उद्योग क्षेत्रातील नामवंतांच्या उपस्थितीत हा शपथविधी पार पडला असून सर्वानी त्यांना मनापासून अभिनंदन केले आहे. तर काही मान्यवरांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना भरभरून शुभेच्छा दिल्या.
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना अभिनंदन केले आहे. ते म्हणाले, “शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेत महायुती सरकारचे हात मजबूत केले आहेत. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व धर्मवीर आनंद दिघे यांच्या ज्वलंत हिंदुत्ववादी विचारांशी एकनिष्ठ राहात एकनाथजींनी आदरणीय देवेंद्रजींच्या साथीने महायुतीचे सरकार महाराष्ट्रात नव्याने स्थापन केले. सर्वसामान्यांच्या हक्काचे सरकार अशी ओळख एकनाथजींच्या नेतृत्वातील सरकारची ओळख होती. महायुतीतील सर्व घटक पक्षातील नेत्यांच्या विनंतीला मान देत माननीय एकनाथजी सरकारमध्ये उपमुख्यमंत्री म्हणून सहभागी होत आहेत. मला विश्वास आहे, त्यांचा अनुभव व त्यांची लोकप्रियता सरकारला बळ देईल. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदेजी यांचे मनःपूर्वक अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा !
पुढे ते म्हणाले, “मी देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस ईश्वरसाक्ष शपथ घेतो की… हे शब्द महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याच्या तोंडून ऐकण्यासाठी या राज्यातील जनतेचे कान मागील पाच वर्षांपासून आतुर होते…. आणि अखेर आज तो आनंदाचा दिवस आला. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून आमचे नेते आदरणीय देवेंद्र फडणवीस यांनी जी यांनी आज शपथ घेतली आणि मन भरून आले.
आम्हा सर्वांसाठी अतिशय भावनिक, आनंददायी आणि विलक्षण समाधान देणारा हा क्षण आहे. देवेंद्र जी, आपण सदैव स्मितहास्य ठेवत आलेले प्रत्येक संकट परतावून लावले. आमच्यासारख्या कार्यकर्त्यांसाठी ही फार मोठी शिकवण आहे. देवेंद्रजी, तुम्ही यापूर्वी अनेक विजय पाहिले असतील, यानंतर देखील पाहणार आहात पण हा विजय आणि आजची आपली मुख्यमंत्री पदाची शपथ अत्यंत विशेष आहे. नकारात्मक राजकारणावर मात करून विकासाभिमुख, सर्वसमावेशक, सुसंस्कृत, सभ्य आणि सत्यनिष्ठ अशा शिवछत्रपतींच्या धर्माधिष्ठित विचारांचा विजय म्हणजे आपली मुख्यमंत्रीपदाची शपथ आहे.
पुढील पाच वर्षांसाठी महाराष्ट्राला सुजलाम सुफलाम करण्यासाठी आपल्या नेतृत्वाखाली आम्ही सर्वजण सदैव कार्यरत राहू. हाच दिवस उद्याच्या सुसंस्कृत, लोकाभिमुख व विकासाच्या राजकारणाची नव्याने सुरुवात करणारा आहे. महाराष्ट्राच्या राजकारणाला, समाजकारणाला व विकासाला सकारात्मक दिशा देणारा आजचा दिवस आहे. अतिशय आनंदाचा, समाधानाचा, उत्साहाचा आणि या राज्यातील चौदा कोटी जनतेचा हा आजचा दिवस आहे. शिवछत्रपतींच्या महाराष्ट्राचे कार्यक्षम मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस जी आपले मनःपूर्वक अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा…
हे ही वाचा: