राज्यात विधानसभा निवडणुका झाल्या. मुख्यामंत्री देवेंद्र फडणवीस तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार बनले आहे. राज्यात मंत्रिमंडळ विस्तारात अनेक नवीन नेत्यांना मंत्रिपद मिळालं तर अनेक जुन्या नेत्यांना वगळण्यात आले. त्यात सुधीर मुनगंटीवार आणि छगन भुजबळ याना देखील मंत्रिपद मिळाला नाही आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ हे नाराज झाले आहे.
जहां नहीं चैना वहां नहीं रहना, असं म्हणत छगन भुजबळने उघडपणे नाराजी व्यक्त केली होती. यानंतर गेल्या काही दिवसांपासून ते सातत्याने नाराज असल्याच्या बातम्या येत होत्या. मात्र आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबीराला छगन भुजबळांनी हजेरी लावली. नाराजी नाट्यानंतर आज पहिल्यांदा छगन भुजबळ हे राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यक्रमासाठी पोहोचले आहेत. त्यामुळे त्यांची नाराजी दूर झाल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांना नाराजीबद्दल प्रश्न विचारण्यात आला आहे. त्यावर त्यांनी स्पष्टपणे भाष्य केले आहे.
काय म्हणाले छगन भुजबळ
नाराजी दूर झाली हा मुद्दा येत नाही. हे पक्षाचं शिबीर आहे. कोणाही एका व्यक्तीचं शिबीर नाही. काल प्रफुल्ल पटेल हे मला येऊन भेटले. त्यांनी दोन तास चर्चा केली. त्यांनी मला सांगितलं की तुम्ही थोडावेळ यायला हवं. सुनील तटकरे यांनीही सांगितलं की तुम्ही थोडावेळ या. मला त्यांनी विनंती केली होती की थोडावेळ तरी या. म्हणून मी आलेलो आहे. याचा अर्थ सर्व काही स्वच्छ झालं असं होत नाही, असे छगन भुजबळ म्हणाले.
राज्यसभेवर जायचं की नाही, असा प्रस्ताव नाही. येवला सोडून मी जाऊ शकत नाही. समता परिषदेचे काम चालू राहिल. माझी तब्येत ठीक नाही. त्यामुळे मी भाषण करणार नाही, असे छगन भुजबळांनी म्हटले.
यावेळी छगन भुजबळ यांना अजित पवारांनी तुम्हाला राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिवेशनासाठी फोन केला होता का, असा प्रश्न विचारला. त्यावर त्यांनी सुरुवातीला नाही, असे म्हटले. यानंतर पुन्हा एकदा त्यांना तोच प्रश्न विचारण्यात आला. त्यावर छगन भुजबळ हे भडकले. “जाऊ द्या, एकदा नाही म्हणून सांगितलं ना”, असे छगन भुजबळ म्हणाले. यामुळे अजित पवारांनी छगन भुजबळ यांना कोणताही संपर्क केलेला नाही हे स्पष्ट झाले आहे.
हे ही वाचा :
नागरिकांना शासकीय सेवा मोबाईलच्या माध्यमातून उपलब्ध करून द्या – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
सहाय्य्क प्राध्यापकाच्या ५०० हुन अधिक जागांची भरती; जाणून घ्या सविस्तर माहिती
Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा .