Saturday, June 3, 2023

Latest Posts

छगन भुजबळांनी उपस्थित केला एक सवाल ?

जयंत पाटील यांना आज ईडी कार्यालयात ११ च्या सुमारास चौकशी साठी बोलावण्यात आले होते. त्यापारने जयंत पाटील हे त्यांच्या वकिलासह पोहूचले तब्बल ३ तास त्यांची चौकशी करण्यात आली.

aजयंत पाटील यांना आज ईडी कार्यालयात ११ च्या सुमारास चौकशी साठी बोलावण्यात आले होते. त्यापारने जयंत पाटील हे त्यांच्या वकिलासह पोहूचले तब्बल ३ तास त्यांची चौकशी करण्यात आली. यावेळी जयंत पाटलांच्या कार्यकर्त्यांनी ईडी कार्यालयाच्या बाहेर बसून आंदोलने आणि आणि नारेबाजी केली. त्याचबरोबर जयंत पाटलांना प्रसारमाध्यमांकडून विचारले गेले असता, जयंत पाटील म्हणाले सत्याचाच विजय होतो मी काहीही केले नाही त्यामुळे मला कसली भीती नाही. जे काही होईल ते मी तुम्हाला सांगेन असे मत त्यांनी मांडले.

यावेळी त्यांच्या सोबत असणाऱ्या राजकारणी मंडळींकडून वेगवेगळ्या प्रकारच्या मत उमटायला सुरुवात झाली. यावेली छगन भुजबळ यांनी देखील त्यांचे मत प्रसारमाध्यमांसमोर मांडले. जयंत पाटील (Jayant Patil) यांनी काही चुकीचे केले नाही, त्यांच्यावर कारवाई होणार नाही. भाजपाकडे (BJP) लॉंड्री आहे, त्यांच्याकडे जे येतात ते स्वच्छ करतात. आमच्या प्रांताध्यक्षांवर कारवाई होत असताना आम्ही गप्प बसयाचे का? असा सवाल छगन भुजबळ यांनी यावेळी उपस्थित केला. ईडी आणि भारत सरकारच्या पोलीस यंत्रणा कशाप्रकारे वापरल्या जात आहे सर्वात आधी माझ्यावर प्रयोग करण्यात आला. त्यावेळी ईडी काय सर्वांना माहिती नव्हते. सर्वोच्च न्यायालयाने (High Court) सांगितले आहे, की भीती निर्माण करु नका. लोकशाही मार्गाने निषेध केला जात आहे. गेल्या काही दिवसांत महाराष्ट्राच्या राजकारणात उलथापालथ सुरु आहे. महाविकास आघाडीमध्ये सध्या तिघाडीचे राजकरण सुरु असल्याचे चित्र आहे. यावर छगन भुजबळ म्हणाले की, दुसरी, तिसरी आघाडी माहिती नाही, पण भाजपच्या हुकूमशाही विरोधात सर्व पक्षांनी उभे राहिले पाहिजे. यावेळी छगन भुजबळांनी समीर वानखेडे यांच्यावर बोलताना ते म्हणाले की, प्रत्येक बापाचे हृदय पोरासाठी बोलत असते, शाहरुख खान मुलासाठी विनवणी करत होता. तुम्ही बरोबर काम केले नाही म्हणून तुमच्यावर कारवाई केली जात असल्याचे भुजबळ म्हणाले.

तसेच प्रसारमाध्यमांकडून जागा वाटपावर प्रश्न केला असता, महाविकास आघाडी जागा वाटपावर म्हणाले की, जागा वाटपावर कुठेही एकमत आणि चर्चा झाली नाही, नवनवीन आकडे समोर येतात आम्ही त्यावर एन्जॉय करतो. कुठल्या पक्षाची कोण व्यक्ती निवडून येणार तो निकष लावला जाणार असल्याचे भुजबळ म्हणाले. तर राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ हे आज नाशिक शहरात होते, त्यावेळी त्यांनी माध्यमाशी संवाद साधला तर नोट बंदीवर भुजबळ म्हणाले की, नोटबंदी हा नेहमीचा खेळ आहे, कर्नाटकात निकाल लागला. त्यांनतर दोन हजारच्या नोटा बंद (Note Ban) केल्या जात आहेत. दुसरीकडे आठ वर्ष झाले नोट बंदी करुन किती काळा पैसा बाहेर आला, हे कळाले नाही, अशी मिश्किल टिप्पणी यावेळी भुजबळांनी केली.

हे ही वाचा:

Jayant Patil ईडी कार्यलयात! कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात आक्रमक | ED Inquiry | NCP

ईडीकडून नोटीस मिळाल्यावर शक्तिप्रदर्शन करण्याचा नवीनच पॅटर्न – संजय शिरसाट

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss