राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे (NCP Ajit Pawar) नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी अतिशय धक्कादायक विधान करत ‘ईडीपासून मुक्तीसाठी भाजपसोबत गेल्याचे वक्तव्य केले आहे. लोकसत्ता वृत्तपत्रात पत्रकार राजदीप सरदेसाई यांच्या ‘द इलेक्शन दॅट सरप्राईझ इंडिया’ या पुस्तकातील छगन भुजबळ यांच्याविषयीचा मजकूर छापून आला आहे. यावरून राजकीय वातावरणात एकच खळबळ उडाली असून यावरून चर्चांना उधाण आले आहे. आधीच विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण तापले असून भुजबळांच्या विधानावरुन त्यात आणखी भर पडली आहे. अश्यातच राजकीय नेत्यांच्या यावरून प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली आहे. यावर आता छगन भुजबळ यांनी स्वतः पत्रकार परिषद घेत यावरून भाष्य केले आहे.
छगन भुजबळ यांनी आज (शुक्रवार, ८ नोव्हेंबर) माध्यमांशी संवाद साधत ‘लोकसत्ता’ वृत्तपत्रात छापून आलेल्या विधानाबाबत भाष्य केले. ते यावेळी म्हणाले, “एक म्हणजे मी लोकसत्ता बरोबर कुठलीही मुलाखत दिली नाही. ईडी पासून सुटका करण्यासाठी सगळे गेले हे आरोप कधीपासून आमच्या सगळ्यांवर सुरू आहेत. महाराष्ट्र्र सदन प्रकरणी कोर्टाने मला क्लीन चीट दिली आहे. तेव्हा ठाकरे यांचे सरकार होते. महायुतीमध्ये आम्ही विकासासाठी आलो. ५४ लोकांनी सह्या केल्या त्यांच्या सर्वांवर आरोप हे नव्हते. सध्या आमच्या मतदार संघात २ हजार कोटी रुपयांचे काम सुरू आहे. त्यामुळे विकासाठी आलो, त्याचा फायदा झाला,” असे ते म्हणाले.
ते म्हणाले, “निवडणुकीच्या तोंडावर हे सुरू का झाले? याचे मला कारण समजत नाही. मी अजून पुस्तक वाचले नाही, ते पुस्तक वाचेल. माझे वकील त्यावर काम करतील. मला जर चुकीचे वाटले तर त्यात मी कारवाईचे काम करेल. नको त्या गोष्टी माझ्या तोंडातून टाकले आहे, याची मी चौकशी करेल. निवडणुकीत हे प्रकाशित का केले त्याचा शोध घेतील. निवडणुकीनंतर त्यावर सविस्तर मी बोलेल. जी कारवाई करता येईल ती मी वकीलामार्फत करेल. माझं लक्ष सध्या निवडणुकीवर आहे,” असे ते म्हणाले.
काय म्हणाले होते छगन भुजबळ?
लोकसत्ता वृत्तपत्रात आलेल्या वृत्तानुसार, छगन भुजबळ म्हणाले, “अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भाजपबरोबर महायुती सरकारमध्ये सहभागी झाल्याचा आनंद पक्षाच्या सर्वच नेत्यांना झाला होता. कारण अर्थातच ईडीपासून सुटका… ती झाल्याने सर्वांनीच सुटकेचा निश्वास सोडला. माझ्यासाठी तर ईडीपासून सुटका म्हणजे एक प्रकारे पुनर्जन्मच होता. मी ओबीसी असल्यानेच केनरीय यंत्रणा माझ्या मागे लागल्या, उच्च जातीचा असतो तर मला असे वागवले नसते.”
हे ही वाचा:
PM Narendra Modi LIVE: धुळ्यातून पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल