Maharashtra Election Result 2024: राज्यातील विधानसभा निवडणुकीची (Maharashtra Vidhansabha Election 2024) धामधूम अखेर संपली असून निकालदेखील स्पष्ट झाला आहे. राज्यात लोकसभेत आलेल्या अपयशानंतर महायुतीने (Mahayuti) जबरदस्त परफॉर्मन्स देत बहुमत मिळवले आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) मात्र विरोधी पक्ष नेता निवडण्यासाठी पुरेसे संख्याबळदेखील मिळवता आलेले नाही. महायुतीचाच मुख्यमंत्री होणार हे निश्चित झाले असले तरीही मुख्यमंत्री मात्र कोण होणार हे अजून जाहीर झाले नाही. अश्यातच काल (बुधवार, २७ नोव्हेंबर) एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषदेत मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडल्याचे संकेत दिले असून केंद्राद्वारे जो निर्णय घेण्यात येईल तो मान्य असल्याचे स्पष्ट केले आहे. अश्यातच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी मुख्यमंत्रीपदाबाबत मोठे वक्तव्य करत मुख्यमंत्री होणं देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचा नैसर्गिक हक्क असल्याचे म्हंटले आहे.
छगन भुजबळ यांनी आज (गुरुवार, २८ नोव्हेंबर) माध्यमांशी संवाद साधत राज्यातील मुख्यमंत्रीपदाच्या तिढ्याबाबत मोठे भाष्य केले आहे. छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्रीपदाबाबत मोठे वक्तव्य करत मुख्यमंत्री होणं देवेंद्र फडणवीस यांचा नैसर्गिक हक्क असल्याचे म्हंटले आहे. यामुळे आता राजकीय वर्तुळात चर्चांना सुरुवात झाली आहे.
काय म्हणाले छगन भुजबळ?
छगन भुजबळ यावेळी म्हणाले, “ओबीसी मुख्यमंत्री व्हावा यापेक्षा गोरगरिबांच संरक्षण करणारा मुख्यमंत्री राज्याला भेटावा ही अपेक्षा. भाजपचाच मुख्यमंत्री होईल, देवेंद्र फडणवीस यांनी मागच्या काही वर्षांमध्ये काम केलं याआधी ते मुख्यमंत्री व्हायला पाहिजे होते पण पक्षाने त्यावेळेस उपमुख्यमंत्री म्हणून काम दिलं त्यांनी काम केलं आणि झोकून काम केलं. मुख्यमंत्री होणं देवेंद्र फडणवीस यांचा नैसर्गिक हक्क आमच्या त्यांना शुभेच्छा! अजित पवार मुख्यमंत्री झाले तरी चांगलं, पण यावेळी 132 आमदार त्यांचे आहेत म्हणून त्यांचा मुख्यमंत्री होईल. फडणवीस झाले तरी आनंदच होईल,” असे ते म्हणाले.
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यावर टीका करत ते यावेळी म्हणाले, “ईव्हीएम मशीनने जिंकलो असेल तर मलादेखील एक लाख मत मिळायला हवी होती, माझं मताधिक्य वाढायला हवं होतं ते कमी झालं. मनोज जरांगे पाटील आदल्या दिवशी सकाळी दहा पासून रात्री दोन पर्यंत गावोगावी फिरले आणि जातिवाद पसरवण्याच काम केलं म्हणून माझं मताधिक्य कमी झालं,” असे ते म्हणाले.
हे ही वाचा:
शिंदे गटातील प्रबळ दावेदार Devendra Fadnavis यांच्या भेटीला…
Eknath Shinde यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा पालकमंत्री ?