Wednesday, November 15, 2023

Latest Posts

व्हायरल व्हिडिओबद्दल Chhagan Bhujbal यांची प्रतिक्रिया

राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते (NCP AJIT PAWAR GROUP) मंत्री छगन भुजबळ (MINISTER CHHAGAN BHUJBAL) यांचे एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. ओबीसींना आता एकमुखाने उभं राहावे लागणार आहे, अन्यथा ओबीसी आता वाचणार नाही. अशी भूमिका मांडणारी ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. सध्या राज्यभारत मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून चर्चा होत आहे. राज्यभरात कुणबी प्रमाणपत्राचे वाटप करण्यात येत आहेत. दुसरीकडे मनोज जरांगे हे देखील राज्य सरकारला वेळोवेळी याबाबत सूचना करत असल्याचे चित्र आहे. अशातच ओबीसी (OBC) नेते मंत्री छगन भुजबळ यांची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. यावर भुजबळांनी स्पष्टीकरण दिले आहे.

छगन भुजबळ म्हणाले की, “मी ओबीसीच्या घरावर म्हणालो नाही, तर सगळ्या ठिकाणी जे आक्रमण सुरू झालेला आहे. ओबीसी आरक्षणावरून त्यानिमित्ताने आमदाराचे घर पेटवले जात आहे, ओबीसी कार्यकर्त्यांचे हॉटेल पेटवले जात आहे. या संदर्भात आपण सध्या कुठेतरी बोललं पाहिजे,”असं म्हणालो असल्याचे ते म्हणाले. छगन भुजबळ म्हणाले की, मी ओबीसीच्या घरावर म्हणलो नाही, सगळ्या ठिकाणी जे आक्रमण सुरू झालेला आहे, त्यावर बोललो आहे. ओबीसी आरक्षणावरून त्यानिमित्ताने आमदाराचे घर पेटवले जात आहे, ओबीसी कार्यकर्त्यांचे हॉटेल पेटवल्या जात आहे. या संदर्भात आपण सध्या कुठेतरी बोललं पाहिजे, एक आवाजामध्ये बोललो पाहिजे, हा त्याचा अर्थ आहे. जसे दुसरे समाज आवाहन करू शकतात, तसं मी ओबीसी समाजातील ३७५ जातींना आवाहन करू शकतो की, आपण आपलं दुःख मांडलं पाहिजे आणि ते एक मुखाने मांडलं पाहिजे. अशी प्रतिक्रिया छगन भुजबळ यांनी दिली आहे. छगन भुजबळ सध्या बीड दौऱ्यावर असून छत्रपती संभाजीनगर येथून बीडकडे आमदार रमेश सोळुंके आणि क्षीरसागर यांच्या भेटीसाठी रवाना झाले आहेत.

हे ही वाचा : 

‘मटका किंग’ वर  बनवणार  नागराज मंजुळे वेबसिरीज,शुटिंगला सुरुवात

MAHARASHTRA ELECTIONS: ग्रामपंचायत निवडणुकांचे निकाल जाहीर

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss