Wednesday, November 22, 2023

Latest Posts

छत्तीसगडच्या भाजपचा जाहीरनामा, सरकारी नोकऱ्या मिळणार

एक लाख रिक्त पदांची सरकारी नोकरदारांची भरती ही घेण्यात येणार आहे. पीएम आवास योजनेअंतर्गत मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीत 18 लाख नागरिकांना पंतप्रधान मोदी आवास योजनेअंतर्गत निधी दिला जाणार आहे.

आगामी निवडणुकांच्या काळात छत्तीसगड साठी प्रस्ताव मांडण्यात आला आहे. रायपूर मध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (AMIT SHAH) ‘छत्तीसगड 2023 साठी मोदींची हमी’ असा जाहीरनामा भाजपकडून काढण्यात आला आहे. या जाहीरनाम्यात जनतेला 20 आश्वासने देण्यात आले आहेत. या जाहीरनाम्यात सरकारने एक लाख सरकारी नोकरी देण्याचे आश्वासन दिले आहे. त्यासोबतच पाचशे रुपयांमध्ये सिलेंडर (GAS CYLINDER) मिळेल अशी ही घोषणा केली आहे. यासोबतच विवाहित महिलांना (MARRIED WOMEN) वार्षिक आर्थिक सहाय्य देण्याचे आश्वासन या जाहीरनाम्यात देण्यात आले आहे. हा केवळ भाजपचा जाहीरनामा नाही तर आमचे एक संकल्प पत्र आहे, आमच्या संकल्पाची पूर्तता करून आम्ही वर्ष 2000 साली छत्तीसगड राज्याची स्थापना केली.

कृषी उन्नती योजना या योजनेअंतर्गत तीन हजार शंभर रुपये प्रतिक्विंटल दराने धान्य खरेदी करता येणार आहे. प्रत्येक पंचायतीच्या कॅश काउंटरवर संपूर्ण एकरकमी मोबदला देण्यात येणार आहे. महतरी वंदना योजनेअंतर्गत विवाहित महिलांना बारा हजार रुपये वर्षाची आर्थिक मदत केली जाणार आहे. यासोबतच एक लाख रिक्त पदांची सरकारी नोकरदारांची भरती ही घेण्यात येणार आहे. पीएम आवास योजनेअंतर्गत मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीत 18 लाख नागरिकांना पंतप्रधान मोदी आवास योजनेअंतर्गत निधी दिला जाणार आहे.

हे ही वाचा : 

कुणबी प्रमाणपत्रबाबत मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय

World Cup 2023, भारताच्या विजयाने सेमीफाइनलचा मार्ग झाला मोकळा

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss