मुख्यमंत्री म्हणून भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी ५ डिसेंबरला शपथ घेतली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी शपथ घेतली. या शपथविधी सोहळ्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली पहिली मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. मंत्रिमंडळाची बैठक ही अर्धा तास चालली. या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कोणता निर्णय घेणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिला निर्णय पुण्यातील रुग्णांसाठी घेतला. पुण्यातील रुग्ण चंद्रकांत कुऱ्हाडे यांना बोन मॅरो ट्रान्सप्लांटसाठी पाच लाख रुपये येण्याचा निर्णयावर देवेंद्र फडणवीस यांनी सही केली.
मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीपूर्वी मुख्यमंत्र्यांनी पहिली स्वाक्षरी मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या फाईलवर केली. पुणे येथील रुग्ण चंद्रकांत शंकर कुऱ्हाडे यांना पाच लाखाची मदत मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीतून देण्याचे निर्देश त्यांनी फाईलवर दिले आहेत. चंद्रकांत कुऱ्हाडे यांच्या पत्नीने बोन मॅरो ट्रान्सप्लांट उपचारासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून अर्थसहाय्य देण्याची विनंती केली होती.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर लगेच त्यांनी या पदाची सूत्र हातात घेऊन अॅक्शन मोडमध्ये आले आहेत. त्यांनी प्रशासनाला अधिक गतीने काम करण्याच्या सूचना दिल्या. मंत्रिमंडळाची बैठक झाल्यानंतर झालेल्या बैठकीचे निर्णय जाहीर करण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार उपस्थित होते. नवीन सरकारची ही पहिलीच पत्रकार परिषद होती.
हे ही वाचा: