महाराष्ट्र विधानसभा २०२४ च्या निवडणूकीत महायुतीने २३० जागांवर विजय मिळवला. यात भाजप १३२ जागा, शिवसेना शिंदे गटाला ५७ जागा आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाला ४१ जागा मिळाल्या. तर महाविकास आघाडीला फक्त ४६ जागा मिळाल्या. यात काँग्रेस १६ जागा, ठाकरे गट २० जागा आणि राष्टवादी शरद पवार गटाला १० जागा मिळाल्या. तसेच इतर अपक्ष यांना १२ जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे राज्यात महायुतीची सत्ता येणार हे आता निश्चित झाले आहे. महाराष्ट्रात सध्या सत्तास्थापनेच्या घडामोडींना वेग आला आहे. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर दोन दिवस होऊनही मुख्यमंत्री कोण होणार हे अजूनही स्पष्ट झालेले नाही. त्यातच आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा राज्यपालांकडे दिला आहे.
आज दि. २६ नोव्हेंबरला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे राजभवनात दाखल झाले. यानंतर अखेर एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. या तिन्ही मंत्र्यांनी राजभवनात राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांची भेट घेतली. यावेळी एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देत असल्याचं पत्र त्यांच्याकडे सोपवलं आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सकाळी ११.१५ च्या दरम्यान राजभवनात गेले. यावेळी त्यांनी राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्याकडे राजीनामा सोपवला. शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला असला तरी जोपर्यंत नवीन सरकार येत नाही तोपर्यंत एकनाथ शिंदे हेच काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून कार्यभार सांभाळणार आहेत. एकनाथ शिंदे यांच्यासोबत देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे सुद्धा तिथे उपस्थित होते.
हे ही वाचा:
ऑस्ट्रेलियन भूमीत Australia संघावर मात करणाऱ्या Team India चे CM Shinde यांच्याकडून कौतुक
Naresh Mhaske , त्यांची जी अवस्था आहे ते संजय राऊतांमुळे…