spot_img
spot_img

Latest Posts

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली भीमाशंकराकडे प्रार्थना…

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी आज (११ सप्टेंबर) श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिर ज्योतिर्लिंगाचे (Sri Kshetra Bhimashankar Temple Jyotirlinga) दर्शन घेऊन विधिवत पूजा केली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी आज (११ सप्टेंबर) श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिर ज्योतिर्लिंगाचे (Sri Kshetra Bhimashankar Temple Jyotirlinga) दर्शन घेऊन विधिवत पूजा केली. यावेळी त्यांनी बळीराजावरचे संकट दूर कर, राज्यभर समाधानकारक पाऊस पडू दे. राज्यावरचे संकट दूर होऊन राज्य सुजलाम सुफलाम होऊ दे, राज्यातील सर्व घटकांना सुख, समाधान आणि आनंद मिळू दे, अशी प्रार्थना भगवान भीमाशंकराकडे केल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी माध्यमांशी बोलताना दिली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, भावीक श्रद्धेने आणि भक्तीभावाने याठिकाणी दर्शनाला येत असतात. मी दरवर्षीप्रमाणे यावर्षीही श्रावणी सोमवारनिमित्त (Shravani Monday) दर्शनासाठी आलो आहे. याठिकाणी लाखो भक्त येत असल्याने शासनाने १४८ कोटींचा विकास आराखडा तयार केला आहे. आतापर्यंत त्यातील 68 कोटी विविध सुविधांवर खर्च करण्यात आला आहे. याठिकाणी येणाऱ्या भाविकांची कुठलीही गैरसोय होणार नाही, अशा सर्व मूलभूत सुविधा शासनाच्या माध्यमातून दिल्या जातील. परिसरात स्वच्छता, पिण्याचे पाणी आणि स्नानगृहाची व्यवस्था करण्याचे तसेच परिसरातील आदिवासी पाड्यात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या आहेत, असेही ते म्हणाले.

पुजेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा भीमाशंकर देवस्थान ट्रस्टच्यावतीने (Bhimashankar Devasthan Trust) सत्कार करण्यात आला. यावेळी खासदार श्रीकांत शिंदे (MP Shrikant Shinde), जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख (Collector Dr. Rajesh Deshmukh), पोलीस अधीक्षक अंकित गोयल (Superintendent of Police Ankit Goyal), माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील (former MP Shivajirao Adharao Patil), माजी आमदार शरद सोनवणे (former MLA Sharad Sonwane) आदी उपस्थित होते. याशिवाय जुन्नर (Junnar) आंबेगावचे उपविभागीय अधिकारी गोविंद शिंदे (Sub-Divisional Officer Govind Shinde), खेड उपविभागीय अधिकारी जोगेंद्र कट्यारे (Village Sub-Divisional Officer Jogendra Katyare), तहसिलदार तथा देवस्थानचे कार्यकारी विश्वस्त संजय नागटिळक (Tehsildar and Executive Trustee of Devasthan Sanjay Nagtilak), श्री क्षेत्र भीमाशंकर देवस्थानचे अध्यक्ष ॲड. सुरेश कौदरे (President of Shri Kshetra Bhimashankar Devasthan Adv. Suresh Kaudre), विश्वस्त मधुकर गवांदे (Trustee Madhukar Gawande), दत्तात्रय कौदरे (Dattatray Kaudre), रत्नाकर कोडीलकर (Ratnakar Kodilkar) आदी उपस्थित होते.

हे ही वाचा: 

जी-२० परिषदेमुळे भारताच्या हाती नेमकं काय लागलं?

नाशिकमध्ये राज ठाकरेंच्या मनसेला मोठा धक्का, माजी आमदार नितीन भोसले यांचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss