Tuesday, April 23, 2024

Latest Posts

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा

गेल्या वर्षी म्हणजेच २०२२ साली अहमदनगरच्या नामांतराबाबत भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी तारांकित प्रश्न केला होता. यावेळी विचारण्यात आलेल्या प्रश्नाला उत्तर देताना केसरकर यांनी वरील माहिती दिली.

गेल्या वर्षी म्हणजेच २०२२ साली अहमदनगरच्या नामांतराबाबत भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी तारांकित प्रश्न केला होता. यावेळी विचारण्यात आलेल्या प्रश्नाला उत्तर देताना केसरकर यांनी वरील माहिती दिली.अहमदनगर जिल्ह्याचे ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर नगर’ असे नामांतर करण्यात येणार आहे. याबाबत मुंबईत लवकरच मंत्रिमंडळाची बैठक घेऊन केंद्र सरकारला पत्र पाठविले जाईल, अशी माहिती प्रभारी मंत्री दीपक केसरकर यांनी बुधवारी विधान परिषदेत दिली होती. त्यानंतर हा प्रशा प्रालिम्बीत राहिला. राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांचा जन्म अहमदनगर जिल्ह्यातील चोंडी या गावी झाला असून, त्यांच्या इतिहासाचे स्मरण होण्याच्या दृष्टीने अहमदनगर जिल्ह्याचे नाव बदलून पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर करण्यात यावे, अशी नागरिकांची मागणी आहे. परंतु राज्य सरकारने अद्यापही त्याची पूर्तता केली नाही, अशी खंत पडळकर यांनी व्यक्त केली.

पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर यांचं जन्मस्थान असलेल्या अहमदनगर येथील चौंडी येथे आज आहिल्यादेवींच्या जयंतीनिमित्त मोठ्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हजर आहेत. या कार्यक्रमात बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अहमदनगर जिल्ह्याचं नाव आहिल्यादेवी होळकर नगर असं व्हावं ही इच्छा व्यक्त केली. त्यापाठोपाठ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लगेच त्यांच्या भाषणात घोषणा केली की, सर्वांची इच्छा आहे, त्यामुळे आपण अहमदनगरचं नाव बदलून आहिल्यादेवी होळकर नगर असं करत आहोत. याबाबतचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, आहिल्यादेवींचं माहेरचं आडनाव शिंदे आहे आणि मी पण शिंदेच आहे. आज येथे रामभाऊ शिंदे आणि गोपीचंद पडळकर यांनी मागणी मांडली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माझीही तीच इच्छा आहे. तसेच तुमच्या सर्वाच्या इच्छेखातर अहमदनगर जिल्ह्याचं नाव आहिल्यादेवी होळकर नगर असं करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यामुळे अहमदनगर वासियांकडून आनंद व्यक्त होताना पाहायला मिळत आहे. तसेच एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी याच दिवसाचे औचित्य साधून हा निर्णय घेतला म्हणून त्यामुळे त्यांच्या निर्णयाचे स्वागत देखील होत आहे.

हे ही वाचा:

निळवंडे धरण प्रकल्प अखेर मार्गी लागला

संजय शिरसाट यांना पोलिसांकडून दिलासा

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss