spot_img
Tuesday, January 14, 2025

Latest Posts

गुंडगिरीला, माफीयांना ताकद देण्याच काम मुख्यमंत्री करत आहेत – Nana Patole

बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणावरून यंदाचं हिवाळी अधिवेशन चांगलंच गाजलं. या अधिवेशनात मुख्यमंत्र्यांनी सखोल चौकशीचे आदेश दिले असून कुणालाही सोडणार नसल्याचे म्हटले. मात्र सातत्याने वाल्मिक कराड यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्याची मागणी केली जात आहे. अशातच काँग्रेस नेते नाना पटोले यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

वाल्मिक कराड यांच्यावरुन नाना पटोले म्हणाले, “माझा एक सल्ला आहे. ते आता अजित पवार यांच्या पार्टीत आहेत अजित पवारांवर जेव्हा आरोप झाले होते. त्यांना तेव्हा मंत्रीमंडळातून बाहेर काढलं होत. चौकशीनंतर त्यांना पुन्हा घेतल होत. त्यांना मंत्रिमंडळातून काढून नंतर चौकशी केली , वाल्मीक कराड हा जो माफीया यांची निःपक्ष चौकशी व्हावी. सत्ता पक्षाच्या आमदारांनी सांगितलेली वस्तुस्थिती लक्षात घेऊन तातडीनं मुख्यमंत्री यांनी कारवाई केली पाहिजे होती. मात्र मुख्यमंत्री यांनी टाईमपास करण्याचे काम केले आहे. गुंडगिरीला माफीयाला ताकद देण्याच काम केले आहे. हे त्या दिवशी स्पष्ट दिसून आले आहे. म्हणून आमची मागणी आहे की, जसे आम्ही अजित पवार यांना मंत्रिमंडळातून बाहेर काढलं गेल होत. तस धनंजय मुंडे यांना मंत्रीमंडळातून बाहेर काढलं पाहिजे मंत्रीमंडळातून त्यांची चौकशी करावी.

पालकमंत्री पदावरून नाना पाटोले म्हणाले,” हे लोकातून आलेल सरकार नाही आहे. हे निवडणूक आयोग आणि भाजपच्या सिंडीकेटमध्ये आलेले सरकार आहे. त्यामुळे लोकांच देणेघेणं यांना नाही, राज्याला किती लुटता येईल, अडीच वर्षांनतंर लुटलं आणि मलाईदार खाते आणि मलाईदार जिल्ह्ये कसे मिळतील याच्यावर सगळा जोर चाललेला आहे.

धाराशीव पुनर्वकासावरून विचारलेल्या प्रश्नांवर ते म्हणाले की, दोन दिवसापूर्वीच धारावी अदानीच्या घशात टाकण्यात आलेली आहे. त्याच्यामुळे सगळं ठरलेल आहे. अदानी केंद्रातील बीजेपीचे नेते आणि निवडणूक आयोग महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये लोकशाही संपवण्याच जे पाप घडवलं गेल होत. उद्योगपतीच्या माध्यमातून हे राज्य चालतं याचं सगळ्यात मोठ उदाहारण धारावीच आहे. सरकारनी कोर्टाचा निकाल येण्याच्या पहिलेच हे सरक्यूलर काढून टाकलं.

भारत जोडो यात्रा नक्षलवाद त्यासंदर्भात आम्ही त्यांना पत्र दिलेले आहे. मी स्वतः दिलेले आहे. कुठल्या नक्षलवादी यंत्रणा त्याच्यात होत्या कुठल्या संघटना होत्या यांची अद्यावत यादी आम्हाला द्या आणि राज्याचे तुम्ही गृहमंत्री तुम्ही होता त्यावेळेस केंद्रात सरकार तुमचं, हे तर फेलियर यांचं नरेंद्र मोदी याचं फेलियर आहे. कोणत्या नक्षलवादी संघटना होत्या याची यादी द्यावी असे लिखीत पत्र मुख्यमंत्री यांना दिलेल आहे.

हे ही वाचा:

रायगडमध्ये पालकमंत्रीपदावरून Aditi Tatkare आणि Bharat Gogawale यांच्यात चुरशीचा सामना

मंत्रिमंडळातून भुजबळांना स्थान न दिल्याने ओबीसी नेते Laxman Hake आक्रमक

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss