spot_img
Thursday, March 20, 2025

Latest Posts

‘मुख्यमंत्र्यांनी Jaykumar Gore यांचा राजीनामा घ्यायला हवा’ – Sanjay Raut

एकीकडे राज्यात बीडचे मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे फोटोस समोर आले आहेत. त्यामुळे राज्याचे राजकारण चांगलेच तापले आहे.तर दुसरीकडे पुणे येथे स्वारगेट बस स्थानाकात झालेल्या बलात्कार प्रकरणी एक एक माहिती समोर येत आहे. असं असतांना राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे (Jaykumar Gore) यांनी एका महिलेला स्वतःचे नग्न फोटो पाठवत विनयभंग केल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केला.

Sanjay Raut PC : एकीकडे राज्यात बीडचे मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे फोटोस समोर आले आहेत. त्यामुळे राज्याचे राजकारण चांगलेच तापले आहे.तर दुसरीकडे पुणे येथे स्वारगेट बस स्थानाकात झालेल्या बलात्कार प्रकरणी एक एक माहिती समोर येत आहे. असं असतांना राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे (Jaykumar Gore) यांनी एका महिलेला स्वतःचे नग्न फोटो पाठवत विनयभंग केल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केला. यानंतर जयकुमार गोरे यांच्याविरोधात विधान करणाऱ्यांविरोधात हक्कभंग दाखल करण्यात आलाय. संजय राऊत, आमदार रोहित पवार (Rohit Pawar) आणि लय भारी youtube चॅनेल यांच्या विरोधात हक्क भंग दाखल करण्यात आला आहे. यावरून संजय राऊत यांनी जयकुमार गोरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केलाय.

“जयकुमार गोरेने हक्कभंग जरुर आणावा. कोणावर आणणार आहेत ते हक्कभंग, त्या महिलेवर. ज्या महिलेचा त्यांनी छळ केला, विनयभंग केला. तिला ज्या पद्धतीची छायाचित्र पाठवून अपमान केला आहे, एक प्रकारे स्वारगेट प्रकरण वेगळ्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न केला असेल. कोर्टात निर्दोष सुटल्याचं कोणाला सांगता? ऑर्डर आमच्याकडेपण आहे. तुरुंगात पण गेलात तुम्ही. तरी या प्रकरणाच गांभीर्य लक्षात न घेता देवेंद्र फडणवीसांनी तुम्हाला मंत्रिमंडळात कसं काय घेतलं?” असा सवाल संजय राऊत यांनी विचारला. “इतकं करुन आता मंत्री झाल्यावर पुन्हा त्या महिलेला त्रास देता, अशी त्या महिलेची राज्यपालांकडे तक्रार आहे. ती अबला महिला उपोषणाला बसलीय, आंदोलन करतेय” असं संजय राऊत म्हणाले. “हे छोटे किरीट सोमय्या आहेत. स्वत:चे नागडे फोटो पाठवायचे, व्हिडिओ काढायचे. अशा नागड्यांना मंत्रिमंडळात घेऊन देवेंद्रजी महाराष्ट्राची काय संस्कृती देशाला दाखवताय” अशी टीका संजय राऊत यांनी केली. “आम्हा विरोधकांवर हल्ला करता. तुम्ही स्वत:कडे खाली वाकून पहा. जयुकमार गोरेंचा राजीनामा घ्यायला हवा तात्काळ. त्या महिलेशी माझं बोलणं झालं, ती महिला बोलते मी आत्महत्या करीन. ती महिला संस्कृत, खानदानी, कुटुंबवत्सल स्त्री आहे” असं संजय राऊत म्हणाले.

जयकुमार गोरे यांचा तत्काळ राजीनामा द्यायला हवा. त्या महिलेशी माझं बोलणं झालं आहे. ती म्हणते मला जर अशा छळातून मुक्त केले नाही तर मी आत्महत्या करेन. मी एक सुसंस्कृत स्त्री आहे. हा माणूस माझ्या मागे हात धुवून लागला आहे. मला रात्री हा माणूस त्रास देतो. माझे जगणे मुश्किल झाले आहे. मला आत्महत्या करावी लागेल. त्यामुळे संसदेचे सदस्य म्हणून समाज जीवनात काम करणाऱ्या आमच्यासारख्या लोकांनी गप्प बसायचे का? मुख्यमंत्र्यांनी जयकुमार गोरे यांचा राजीनामा घेतला पाहिजे, अशी मागणी त्यांनी यावेळी केली.

Latest Posts

Don't Miss